शब्द पेरा काव्य पुरस्कारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:24 AM2018-11-19T00:24:44+5:302018-11-19T00:48:20+5:30
सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या अन्नपूर्णा हॉलमध्ये गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने उत्कृष्ट काव्यसंग्रहांसाठी ४१ कवींना स्व. स्मिता पाटील शब्द पेरा काव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सप्तशृंगगड : सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या अन्नपूर्णा हॉलमध्ये गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने उत्कृष्ट काव्यसंग्रहांसाठी ४१ कवींना स्व. स्मिता पाटील शब्द पेरा काव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कविसंमेलनाचे अध्यक्ष खलील मोमीन व चंद्रकांत महामिने यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित कवींनी आपल्या कविता सादर केल्या. प्रमुख पाहुणे म्हणून कवी विसूभाऊ बापट, उद्धव आहेर, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त रावसाहेब शिंदे, शरद पुराणिक, किशोर पाठक, उमाकांत गायकवाड उपस्थित होते.
कवयित्री सारिका खैरनार भामरे यांच्या ‘शब्दांच्या हिंदोळ्यावर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. रेल्वेचे पायलट पंडित बहिरम यांनी प्रसंगावधान राखून प्रवाशांचे प्राण वाचविले याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
तसेच बचतगटाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अश्विनी बोरस्ते यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कवी प्रकाश होळकर, लक्ष्मण महाडिक, विजय मिठे, कमलाकर देसले, नानासाहेब बोरस्ते, देवीदास चौधरी, शंकर बोराडे, कैलास चावडे, विलास पगार, सीमा सोनवणे, गोपाळ गवारी, शरद आडके आदींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक
सुरेश पवार दत्तप्रभू अॅग्रोचे चेअरमन परशुराम देवरे यांच्या संयुक्त विद्यमाने सदर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.