यशवंत गौरव महिला रत्न पुरस्कारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:17 AM2021-03-09T04:17:16+5:302021-03-09T04:17:16+5:30
येथील विविध सामाजिक संस्थातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त झालेल्या ‘यशवंत गौरव महिला रत्न’ पुरस्कार वितरण सोहळ्यात श्रीमती जाधव बोलत होत्या. ...
येथील विविध सामाजिक संस्थातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त झालेल्या ‘यशवंत गौरव महिला रत्न’ पुरस्कार वितरण सोहळ्यात श्रीमती जाधव बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राहुरी कृषी विद्यापीठाचे प्रमुख संशोधक डॉ. तुलसीदास बासष्टेवाड तर पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती जाधव, सहायक गटविकास अधिकारी हेमंत काथेपुरी, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक राहुल गवई, अरविंद सोनवणे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे, महेंद्र आहिरे, शशिकांत आहिरे, गणेश ढवळे, रूपेश सोनवणे, विजय सूर्यवंशी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. पोलीस उपनिरीक्षक राहुल गवई यांनी सादर केलेल्या कवितेला उपस्थितांनी दाद दिली. मान्यवरांच्या हस्ते ५१ महिलांना ‘यशवंत गौरव महिला रत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर पोलीस निरीक्षक गायकवाड, उपनिरीक्षक रविराज बच्छाव व गटविकास अधिकारी काथेपुरी यांना ‘बागलाण गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास प्रशांत कोठावदे, उमेश पवार, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र देवरे, कपिल सोनवणे, प्रवीण पवार, चंद्रकांत जोशी, दावल सोनवणे, नितीन कापुरे, कृष्णा जगताप, गणेश ढवळे आदींसह महिला उपस्थित होत्या. संतोष जाधव यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. ललित खैरनार यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.
फोटो- ०८ सटाणा महिला पोलीस
सटाणा येथील विविध सामाजिक संस्थातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त झालेल्या सोहळ्यात सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती जाधव यांना ‘यशवंत गौरव महिला रत्न’ पुरस्कार प्रदान करताना दामिनी पथकप्रमुख पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव. समवेत पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड. समवेत सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक राहुल गवई.
===Photopath===
080321\08nsk_50_08032021_13.jpg
===Caption===
फोटो- ०८ सटाणा महिला पोलीस सटाणा येथील विविध सामाजिक संस्थातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त झालेल्या सोहळ्यात सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती जाधव यांना 'यशवंत गौरव महिला रत्न' पुरस्कार प्रदान करताना दामिणी पथकप्रमुख पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव. समवेत पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड. समवेत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक राहुल गवई.