जिल्ह्यात दिवसभरात ७४१ रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 12:19 AM2020-08-29T00:19:58+5:302020-08-29T01:14:57+5:30

जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या आता ३४ हजार ४६ इतकी झाली आहे. शुक्रवारी (दि. २८) नव्याने ९४८ रुग्ण आढळून आले. सर्वाधिक ७४२ रुग्ण नाशिक शहरात मिळून आले असून, उपचारार्थ दाखल ५ रुग्ण दगावले. मागील दोन दिवसांच्या तुलनेत शुक्र वारी मृतांचा आकडा कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात दिवसभरात ७४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

In the district, 741 patients were overcome with corona in a day | जिल्ह्यात दिवसभरात ७४१ रुग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यात दिवसभरात ७४१ रुग्णांची कोरोनावर मात

Next
ठळक मुद्दे५ बळी : ९४८ नवे रु ग्ण; बाधितांची संख्या ३४ हजार पार

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या आता ३४ हजार ४६ इतकी झाली आहे. शुक्रवारी (दि. २८) नव्याने ९४८ रुग्ण आढळून आले. सर्वाधिक ७४२ रुग्ण नाशिक शहरात मिळून आले असून, उपचारार्थ दाखल ५ रुग्ण दगावले. मागील दोन दिवसांच्या तुलनेत शुक्र वारी मृतांचा आकडा कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात दिवसभरात ७४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
मागील चार दिवसांपूर्वी कोरोनाबधित रुग्णांचा आकडा घसरला होता; मात्र मंगळवारनंतर अचानकपणे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गुरुवारी कोरोनाबाधित रुग्णांचा जिल्ह्याचा आकडा थेट १ हजारांच्यापुढे सरकला होता. तसेच शुक्र वारीसुद्धा ९४८ रु ग्ण मिळून आले. दिवसभरात जिल्ह्यात १ हजार २५२ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक ९४७ रुग्ण शहरातील आहेत. एकूणच शहरवासीयांकरिता कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे.
सिन्नर तालुक्यात १२२९ बाधित
सिन्नर तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता कायम आहे. तालुक्यातील कोरोनाबळींची संख्या ३१ झाली आहे. शुक्रवारी रुग्णसंख्येत २४ रुग्णांची भर पडली. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२२९ झाली असून, ९२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर २८१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
येवल्यातील ८ जण कोरोनामुक्त
च्येवला शहरासह तालुक्यातील ९ संशयितांचे कोरोना अहवाल शुक्र वारी, (दि. २८) पॉझिटिव्ह आले आहेत, तर ८ बाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. बाधितांमध्ये तालुक्यातील अंदरसूल, एरंडगाव, बाळापूर, येवला शहर येथील रुग्णांचा समावेश आहे. यात सात अहवाल खाजगी लॅबकडील असून, २ अहवाल रॅपिड अँटिजेन टेस्टचे आहेत.
च्नाशिक ग्रामीणच्या तुलनेत शहरात स्थिती काहीशी चिंताजनक होत चालली आहे. जिल्ह्यातील वाढत्या रु ग्णसंख्येसोबत दगावणाऱ्या रुग्णांचे प्रमाण शुक्र वारी कमी झाल्याने तितकाच दिलासा मिळाला. गुरु वारी सर्वाधिक २१ रु ग्ण मृत्युमुखी पडले होते. जिल्ह्यात आतापर्यंत २७ हजार ३३७ रु ग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे.




तसेच ५ हजार ८७० रु ग्ण उपचार घेत आहेत. ८८ हजार ५९५ सशयितांचे नमुना चाचणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
मालेगावी ३५ नवे रुग्ण
मालेगाव शहर परिसरात कोरोनाचे ३५ नवे बाधित आढळले असून, त्यात संगमेश्वरसह तालुक्यातील येसगाव, देवघट, दाभाडी आणि टेहरे येथील बाधितांचा समावेश आहे. १६६ जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यात १३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह मिळाले. बाधितांमध्ये दाभाडी, सोयगाव, मालेगाव कॅम्प, संगमेश्वर, टेहरे येथील बाधितांचा समावेश आहे.

Web Title: In the district, 741 patients were overcome with corona in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.