जिल्हा बँक शाखाधिकाऱ्याला हळदी-कुंकू लावून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:12 AM2021-05-29T04:12:49+5:302021-05-29T04:12:49+5:30
मोरे यांचा चहाचा व्यवसाय असून त्यावर त्यांच्या संपूर्ण परिवाराचा उदरनिर्वाह चालतो. त्यांना दोन मुले असून मोठा मुलगा रामेश्वर ...
मोरे यांचा चहाचा व्यवसाय असून त्यावर त्यांच्या संपूर्ण परिवाराचा उदरनिर्वाह चालतो. त्यांना दोन मुले असून मोठा मुलगा रामेश्वर अशोक मोरे (४२) गेल्या दोन वर्षांपासून हेडनेक कॅन्सरने आजारी आहे. मोरे यांनी गेल्या २५ वर्षांपासून नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत अल्पबचत करून एक लाख ८० हजारांची ठेव ठेवली होती. मोरे यांची पत्नी चार वर्षांपूर्वी आजाराने दगावली. त्यावेळीही त्यांना पत्नीच्या उपचारासाठी बँकेकडून पैसे मिळाले नाही. काही दिवसांनी मोरे यांना स्वतःला पक्षघाताचा झटका आला. त्यांनी वारंवार बँकेत चकरा मारून त्यांना उपचारासाठी पैसे मिळाले नाही. मुलाच्या आजारपणातही पैसे देण्यात आले नाही. त्यामुळे या परिवाराने बंडूकाका बच्छाव यांच्याकडे धाव घेतली व न्याय देण्याची विनंती केली होती.
इन्फो
जबाबदारीची दिली जाणीव
बंडूकाका बच्छाव यांनी जिल्हा बँकेच्या मार्केट कमिटी शाखेत विभागीय शाखा अधिकारी मांगीलाल डंबाळे व शाखा व्यवस्थापक आर. डी. देवरे यांना बोलावून घेत मुलाच्या कॅन्सरच्या उपचारासाठी हक्काचे एफडीचे पैसे मिळालेच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. शाखाधिकारी व व्यवस्थापक यांची हळदी-कुंकू लावून पूजा केली. त्यांना पुष्पहार घालून कॅन्सर रुग्णाबद्दल असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देत अनोखे आंदोलन केले. या आंदोलनानंतर मोरे परिवाराच्या हक्काच्या पैशांचा प्रश्न अवघ्या दोन तासांत मार्गी लावून जागेवर त्यांना त्यांचे सर्व पैसे परत करण्यात आले.