वसुलीसाठी जिल्हा बॅँकेच्या कर्मचाºयांच्या सुट्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 01:40 AM2018-02-27T01:40:18+5:302018-02-27T01:40:18+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्जवसुलीसाठी झपाटलेल्या बॅँक अध्यक्षांनी मार्च अखेरपर्यंत जिल्हा बॅँकेच्या थकीत कर्जाची वसुली करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी मार्च महिन्यातील शनिवार, रविवारच्या तसेच सण, उत्सवाच्या सुट्या रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्जवसुलीसाठी झपाटलेल्या बॅँक अध्यक्षांनी मार्च अखेरपर्यंत जिल्हा बॅँकेच्या थकीत कर्जाची वसुली करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी मार्च महिन्यातील शनिवार, रविवारच्या तसेच सण, उत्सवाच्या सुट्या रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. सुटीच्या दिवशी आपापल्या कार्यक्षेत्रातील कर्जदाराकडे जाऊन कर्मचारी व अधिकाºयांनी वसुलीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केदा अहेर यांनी केले आहे. जिल्हा बॅँकेची आर्थिक परिस्थिती पाहता बॅँकेने पीककर्ज, वाहन कर्जापोटी हजारो कोटी रुपये कर्जवाटप केले असून, नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर बॅँकेची कर्जवसुली जवळपास ठप्प झाली. पैसे नसल्याचे कारण देत शेतकºयांनी हात वर केले. त्याचबरोबर बॅँकांकडेही रक्कम शिल्लक नसल्यामुळे पैसे येण्या-जाण्याचा मार्ग खुंटला. परिणामी २७०० कोटी रुपये वसुलीअभावी जिल्हा बॅँक आर्थिक संकटात सापडली. या बॅँकेकडे जिल्हा परिषद, पंचायत समित्या, सार्वजनिक बांधकाम खाते अशा शासकीय कार्यालयांकडील रक्कमदेखील अडकून पडल्याने व्यवहार ठप्प झाले. अशा परिस्थितीत शेतकरी कर्जमाफीच्या विषयावरूनही विरोधकांनी रान पेटविल्यामुळे शेतकºयांना कर्जमाफीची आशा लागून राहिली, परिणामी त्यांनी कर्जफेडीकडे पाठ फिरविली. त्यामुळे जिल्हा बॅँकेला ऊर्जितावस्था आणण्यासाठी वसुलीशिवाय पर्यायच नसल्याचे पाहून अध्यक्ष केदा अहेर यांनी कठोर निर्णय घेण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी ऐपतदारांच्या मालमत्तेवर बोजा चढवून लिलाव करण्याबरोबरच वाहन जप्ती व अन्य कायदेशीर मार्ग अवलंबिण्याचे आदेश त्यांनी बॅँक अधिकारी व कर्मचाºयांना दिले आहेत.
अपरिहार्य कारणाखेरीज रजा न घेता कर्जवसुलीसाठी कार्यक्षेत्रात फिरती करून जास्तीत जास्त वसुलीसाठी वेळ देऊन कामकाज करावे व कर्जवसुलीचे उद्दिष्ट गाठावे, असे आवाहन केले आहे. स्वत: अहेर हेदेखील तालुकानिहाय बैठका घेऊन कर्जदारांना पैसे भरण्याबाबत आवाहन करीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सोमवारी त्यांनी परिपत्रक काढून जिल्हा बॅँकेच्या सर्व शाखांचे कर्मचारी व अधिकाºयांना मार्च अखेरपर्र्यंत कर्ज वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मार्च महिन्यातील शनिवार व रविवारी सुटीच्या दिवशी सुटी न घेता वसुलीसाठी दौरे करावेत, अशा सूचना केल्या आहेत.