जिल्हा बॅँकेला ‘समृद्धी’ पावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 01:18 AM2018-03-24T01:18:09+5:302018-03-24T01:18:09+5:30
जिल्हा बॅँकेने थकबाकीदार सभासदांकडील कर्जवसुलीसाठी जोरदार मोहीम हाती घेतली असताना त्याला प्रस्तावित समृद्धी महामार्गाचीही चांगलीच जोड मिळाली असून, बॅँकेकडे कर्जासाठी तारण ठेवलेली जमीन समृद्धी महामार्गासाठी देताना त्यावरील बोजाची रक्कम थेट जिल्हा बॅँकेत वर्ग करण्यात आल्याने जिल्हा बॅँकेला सिन्नर तालुक्यात समृद्धी महामार्ग चांगलाच पावला आहे.
नाशिक : जिल्हा बॅँकेने थकबाकीदार सभासदांकडील कर्जवसुलीसाठी जोरदार मोहीम हाती घेतली असताना त्याला प्रस्तावित समृद्धी महामार्गाचीही चांगलीच जोड मिळाली असून, बॅँकेकडे कर्जासाठी तारण ठेवलेली जमीन समृद्धी महामार्गासाठी देताना त्यावरील बोजाची रक्कम थेट जिल्हा बॅँकेत वर्ग करण्यात आल्याने जिल्हा बॅँकेला सिन्नर तालुक्यात समृद्धी महामार्ग चांगलाच पावला आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या थेट जमिनी खरेदी केल्या जात असून, त्यासाठी बाजारभावाच्या पाचपट दर देण्यात आल्याने आजवर सिन्नर व इगतपुरी या दोन्ही तालुक्यांतून सुमारे ५६ टक्के जमिनीची खरेदी करण्यात येऊन त्यापोटी ६७४ कोटी रुपये जागामालक शेतकºयांच्या बॅँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत. यात काही शेतकºयांच्या जमिनीवर जिल्हा बॅँकेचा पीक कर्जाचा बोजा चढ विण्यात आला आहे, तर काहींनी शेतजमिनी तारण ठेवून बॅँकेकडून कर्ज घेतले आहे. राज्यातील शेतकºयांना शासनाने कर्जमाफी जाहीर केली, तर ज्या शेतकºयांकडे दीड लाखापेक्षा अधिक रक्कम थकली आहे त्यांच्या विरोधात जिल्हा बॅँकेने वसुली मोहीम हाती घेतली आहे. यात प्रामुख्याने समृद्धी महामार्गासाठी जागा जात असलेल्या शेतकºयांचाही समावेश आहे. ज्या शेतकºयाच्या जमिनीवर बॅँकेचा बोजा चढला आहे किंवा ज्यांनी शेत तारण ठेवून कर्ज घेतले आहे अशा शेतकºयांना समृद्धी महामार्गाचा मिळालेला मोबदला जिल्हा बॅँकेने कर्जापोटी वर्ग करून घेतला आहे. सिन्नर तालुक्यात अशा प्रकारे तीन कोटी ४१ लाख रुपये जिल्हा बॅँकेच्या खात्यात वळते करण्यात आले आहेत. अजून जवळपास ५० टक्के जमिनीची खरेदी शिल्लक आहे.
तीन कोटी ४१ लाख रुपये मिळाले
सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील ज्या ४९ गावांमधून समृद्धी महामार्ग जात आहे त्या जागामालक शेतकºयांकडून जिल्हा बॅँकेला सुमारे १५ कोटी रुपये घेणे आहे. त्यातून एकट्या सिन्नर तालुक्यातून तीन कोटी ४१ लाख रुपये मिळाले असून, इगतपुरी तालुक्यातूनही दीड ते दोन कोटी रुपये मिळाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे जिल्हा बॅँकेच्या वसुलीला चांगलाच हातभार लागला आहे.