जिल्हा बॅँकेच्या ताब्यात पाऊण कोटींच्या चार मालमत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:16 AM2019-08-30T00:16:16+5:302019-08-30T00:17:04+5:30
नाशिक : शेतकऱ्यांची कर्जमाफी व तीन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या नोटबंदीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या जिल्हा बॅँकेने हाती घेतलेल्या थकबाकी वसुली मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळू लागला असून, थकबाकीदारांना तगादा लावून वसुली करण्याबरोबरच कायदेशीर मार्गाचा अवलंब करीत त्यांच्या मालमत्ता ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणून पाऊण कोटी रुपये किमतीच्या चार मालमत्ता जिल्हा बॅँकेच्या मालकीच्या झाल्या आहेत.
नाशिक : शेतकऱ्यांची कर्जमाफी व तीन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या नोटबंदीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या जिल्हा बॅँकेने हाती घेतलेल्या थकबाकी वसुली मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळू लागला असून, थकबाकीदारांना तगादा लावून वसुली करण्याबरोबरच कायदेशीर मार्गाचा अवलंब करीत त्यांच्या मालमत्ता ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणून पाऊण कोटी रुपये किमतीच्या चार मालमत्ता जिल्हा बॅँकेच्या मालकीच्या झाल्या आहेत.
जिल्हा बँकेची आर्थिक परिस्थिती बिकट असून, ठेवीदारांना त्यांचे ठेवीचे पैसे देण्यास अडचण निर्माण होण्याबरोबरच कर्मचाऱ्यांचे वेतनदेखील वेळेवर होत नाही. शासनाने केलेली नोटाबंदी व त्यापाठोपाठ शेतकºयांची कर्जमाफीमुळे बॅँक अडचणीत आली असली तरी, सुमारे दोन हजार कोटींहून अधिक रक्कम थकबाकीदारांकडे थकीत आहे. या थकबाकीदारांकडून वसुलीशिवाय पर्याय नसल्याचे पाहून जिल्हा बॅँकेने थकबाकीदारांकडून सक्तीची वसुली सुरू केली असून, त्यासाठी विविध क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, वाहने जप्त करून लिलाव करणे, याचबरोबर सहकार विभागाच्या मदतीने थकबाकीदारांनी तारण ठेवलेल्या मालमत्तांचे मूल्यांकन करून त्या वसुलीसाठी दावे दाखल केले तसेच महसूल खात्याच्या माध्यमातून या मालमत्तांवर जिल्हा बॅँकेचे नावे लावून घेतली आहेत.
बँकेच्या या कारवाईमुळे काही थकबाकीदारांनी पैसे भरण्यास सुरुवात केली असून, ज्यांनी बॅँकेला प्रतिसाद दिला नाही त्यांच्या मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव केला. तथापि, बºयाच थकबाकीदाराच्या मालमत्तेचे तीन वेळेस जाहीर लिलाव व फेरलिलाव पुकारून ही लिलावात बोली लावण्यास कोणीही पुढे न आल्यामुळे अखेर जिल्हा
बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०चे कलम १०० अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम ८५ अन्वये विभागीय सहनिबंधकांच्या कार्यालयात प्रस्ताव सादर करून लिलावातील मालमत्तेवर थकबाकीदाराचे
नाव कमी करून भोगवटादार
सदरी बॅँकेचे नाव लावण्यात आले आहे. बँकेने ताब्यात घेतलेल्या मालमत्ताजिल्हा बँकेने ताब्यात घेतलेल्या मालमत्तांमध्ये मे पांडुरंग मिल्क प्रोड््क्टस, (चिंचगव्हाण, मालेगाव). महेंद्रसिंग दला पवार, सुभद्राबाई दला पवार व भूषण महेंद्रसिंग दला पवार यांच्या संयुक्त मालकीची मिळकत. मे साई दूध डेअरी, (सीताने, मालेगाव) निंबा सीताराम भामरे, सुनंदा निंबा भामरे व गंगाबाई सीताराम भामरे, श्री कृष्ण डेअरी फार्म (पळशी, नांदगाव), विलास शांताराम सांगळे, वर्षा मिल्क प्रोड््क्टस (बोराळे, नांदगाव), सुभाष दगा पाटील व किरण सुभाष साळुंखे पाटील यांचा समावेश आहे.