पीक कर्ज वाटपात जिल्हा बँकेची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 05:14 PM2020-08-19T17:14:44+5:302020-08-19T17:15:21+5:30
कळवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरीप पिक कर्ज वाटपाची गती संथावली आहे. जिल्हा बँक वगळता इतर बँकांमध्ये कर्जवाटप केवळ नावलाच आहे. महात्मा फुले कृषी कर्जमाफी रखडल्याने शेतकऱ्यांना कर्जाचा परतावा करणेही शक्य न झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर थकबाकी दिसत असल्याने अडचणी वाढल्या आहेत.
कळवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरीप पिक कर्ज वाटपाची गती संथावली आहे. जिल्हा बँक वगळता इतर बँकांमध्ये कर्जवाटप केवळ नावलाच आहे. महात्मा फुले कृषी कर्जमाफी रखडल्याने शेतकऱ्यांना कर्जाचा परतावा करणेही शक्य न झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर थकबाकी दिसत असल्याने अडचणी वाढल्या आहेत.
एप्रिलपासून सुरु झालेल्या कर्जवाटपात केवळ जिल्हा बँकेने आघाडी घेतली आहे. कोरोना संकटात संपूर्ण जग लॉकडाऊन असताना शेती मात्र अनलॉक होती. जास्तीत जास्त शेतकºयांना पीककर्ज उपलब्ध होण्यासाठी पीककर्ज योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत, ग्रामीण, खाजगी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप करण्याच्या सूचना शासनाने दिल्या असल्या तरी कर्ज देतांना राष्ट्रीयकृत बँकानी अडचणींचा डोंगर शेतकºयांपुढे उभा करु न चकरा मारण्यात वेळ घालवला गेला. यंदाच्या खरीप हंगामात एकूण ४६००० हेक्टर क्षेत्रात ९५ टक्के खरीपाची पेरणी झाली आहे.
तालुक्यात अन्नधान्याचे क्षेत्र ३८३६४ हेक्टर असून २२११६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली असून तालुक्यात गळीत धान्य क्षेत्र ७८७६ हेक्टर क्षेत्र असून तालुक्यात ९७९७ हेक्टर क्षेत्रात १२५ टक्के पेरणी झाली आहे.
तालुक्यात जिल्हा बँकेने आपल्या १० शाखांच्या माध्यमातून शेतकºयांना पीक कर्ज उपलब्ध करु न दिले. १८३ जनरल सभासदांना २ कोटी १७ लाख ५४ हजाराचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. ६५५ अल्प सभासदांना ३ कोटी ४० लाख रु पये असे एकूण ८३८ सभासदांना ५ कोटी ५७ लाख रूपयांचे पीक कर्ज वाटप केले. बँक आॅफ महाराष्ट्र, कळवण, देसराने, अभोणा, कनाशी, ओतूर, बेज शाखा तसेच कॅनरा बँक नांदुरी, युनियन बँक कळवण व स्टेट बँक कळवण, अभोणा शाखा व एच डी एफ सी कळवण शाखा यांनी पीक कर्ज वाटप केले आहे.
जिल्हा बँकेपेक्षा राष्ट्रीयीकृत बॅँकामधून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रि या किचकट असल्याने शेतकरी या बँकामध्ये जाणे टाळतात.मात्र जिल्ह्यात काही ठिकाणी जिल्हा बँकेची शाखा नसल्याने शेतकºयांना राष्ट्रीयकृत बँकात जावे लागते.मात्र या बँकाकडून शेतकºयांना विविध कागदपत्रांची मागणी तसेच एकाच कामासाठी वांरवार पायपीट करण्यास भाग पाडले जाते.त्यामुळे शेतकरी वैतागून पीक कर्जाची उचलच करीत नाही.