जिल्हा बॅँक सर्वोच्च न्यायालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 01:31 AM2017-08-11T01:31:35+5:302017-08-11T01:32:32+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडील ८ नोव्हेंबर २०१६ पूर्वीच्या हजार व पाचशे रुपयांच्या २२ कोटींच्या नोटा रिझर्व्ह बॅँकेने स्वीकारलेल्या नाहीत. या नोटा सध्या बॅँकेत पडून आहेत. रिझर्व्ह बॅँकेने या नोटा स्वीकाराव्यात यासाठी राज्यातील अन्य बॅँकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, नाशिक जिल्हा बॅँकेनेही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडील ८ नोव्हेंबर २०१६ पूर्वीच्या हजार व पाचशे रुपयांच्या २२ कोटींच्या नोटा रिझर्व्ह बॅँकेने स्वीकारलेल्या नाहीत. या नोटा सध्या बॅँकेत पडून आहेत. रिझर्व्ह बॅँकेने या नोटा स्वीकाराव्यात यासाठी राज्यातील अन्य बॅँकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, नाशिक जिल्हा बॅँकेनेही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी हजार व पाचशे रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यापूर्वी जिल्हा बॅँकेत हजार व पाचशे रुपयांच्या तब्बल २२ कोटींच्या नोटा होत्या. या निर्णयानंतर सर्वत्र धावपळ सुरू झाली. राष्ट्रीय बॅँकांसह जिल्हा बॅँकेतही जुन्या नोटा बदलून देण्यात आल्या. मात्र, तीन दिवसांनंतर जिल्हा बॅँकेत जमा झालेल्या नोटा स्वीकारल्या जाणार नसल्याची भूमिका रिझर्व्ह बॅँकेने घेतली. या दरम्यान जिल्हा बॅँकेकडे ३२१ कोटींच्या नोटा जमा झाल्या होत्या.