जिल्हा बॅँक : मालेगाव तालुक्यात जप्ती मोहीम वसुली न केल्यास कर्मचाºयांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 11:57 PM2018-03-03T23:57:24+5:302018-03-03T23:57:24+5:30
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची स्थापना करणाºया संस्थापकांच्या मालेगाव तालुक्यात जिल्हा बॅँकेची सर्वाधिक थकबाकी आहे.
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची स्थापना करणाºया संस्थापकांच्या मालेगाव तालुक्यात जिल्हा बॅँकेची सर्वाधिक थकबाकी असून, कर्मचाºयांनी मार्चअखेर शंभर टक्के वसुली करावी अन्यथा ज्यांनी वसुली केली नाही अशांच्या तालुक्याबाहेर बदल्या करण्याचा इशारा जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी दिला आहे. शनिवारी मालेगाव तालुक्यातील कर्जवसुली आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. मालेगाव तालुक्यात तीन विभाग असून, ३२२ कोटी ७४ लाखांचे कर्ज थकीत आहे. त्यातील फक्त ७६ कोटी ५६ लाख रुपये वसूल झालेले आहेत. कलम १०७ अन्ये ६८५९ सभासदांच्या सातबारा उताºयावर बॅँकेचे इतर अधिकारात नावे लागले असून, सदर सभासदाच्या लिलावाची प्रक्रिया ३१ मार्चअखेर करण्यात यावी, अशा सूचना अहेर यांनी यावेळी केल्या. मालेगाव तालुक्यात मोठी थकबाकी असून, जे कर्ज वाटप केले आहे ते तालुक्यातील कर्मचारी वर्गानेच केले आहे. त्यामुळे अशा कर्मचाºयांनी १५ मार्चअखेर समाधानकारक वसुली केली नाही तर संबंधित कर्मचाºयांची, विभागीय अधिकाºयाची तालुक्याबाहेर बदली करण्यात येईल. तसेच जे कर्मचारी या वर्षात निवृत्त होतील अशा कर्मचाºयांच्या निवृत्तीनंतरच्या रकमा न देण्याचेही त्यांनी सुचित केले. संदीप सोनजे औद्योगिक संस्थेवर सरपेसी अंतर्गत कारवाई केली असून, दर संस्थेच्या मालमत्तेच्या लिलावाची तत्काळ जाहिरात देण्याचे तसेच रेणुकादेवी सूतगिरणीच्या मालमत्तेच्या लिलावाची राज्यस्तरीय जाहिरात काढण्यात येणार आहे. यावेळी उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे, सचिव संघटनेचे विश्वनाथ निकम आदी उपस्थित होते.