कर्जवसुलीबाबत जिल्हा बॅँकेचे बुधवारी धोरण ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 01:42 AM2018-03-27T01:42:20+5:302018-03-27T01:42:20+5:30

जिल्हा बॅँकेच्या कर्जवसुली पथकासमक्ष विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याच्या सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील प्रकारामुळे जिल्हा बॅँक प्रशासन काळजीत पडले असून, अशा घटनांवर मात करण्यासाठी नेमकी काय भूमिका घ्यावी, यासाठी बुधवारी संचालक मंडळाची तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे.

 District bank will decide on debt relief on Wednesday | कर्जवसुलीबाबत जिल्हा बॅँकेचे बुधवारी धोरण ठरणार

कर्जवसुलीबाबत जिल्हा बॅँकेचे बुधवारी धोरण ठरणार

Next

नाशिक : जिल्हा बॅँकेच्या कर्जवसुली पथकासमक्ष विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याच्या सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील प्रकारामुळे जिल्हा बॅँक प्रशासन काळजीत पडले असून, अशा घटनांवर मात करण्यासाठी नेमकी काय भूमिका घ्यावी, यासाठी बुधवारी संचालक मंडळाची तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे. कर्जदारांनी अशी भूमिका घेतल्यास बॅँकेच्या वसुलीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. जिल्हा बॅँकेला जवळपास २२०० कोटी रुपये मार्चअखेर वसूल करण्याचे आव्हान असून, अधिकाधिक कर्ज वसुली केल्यावरच बॅँकेचे गतवैभव प्राप्त होऊन गरजू शेतकऱ्यांना पुढील काळात कर्जपुरवठा करणे शक्य होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कर्जवसुली मोहिमेंतर्गत रविवारी सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे वसुली पथकासमोरच मुकुंद वाजे या कर्जदाराने विषारी औषध सेवन केल्याची घटना घडली. अशा घटनेतून कायदेशीर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने कर्जदारांना तगादा लावायचा की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे़ पांढुर्ली येथील घटनेने अन्य कर्जदारदेखील त्याच पावलावर पाऊल ठेवून आत्महत्येची धमकी देत वसुलीत खोडा घालण्याचा प्रयत्न करू शकतील अशा परिस्थितीत नेमके काय करावे, यावर विचारविनिमय करण्यात येत आहे. या संदर्भात जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात बुधवारी सर्व संचालकांची बैठक बोलविण्यात आल्याचे सांगितले. कर्जदारांकडून बॅँकेला सहकार्याची गरज असून, वसूल केलेल्या कर्जातून अन्य ठेवीदार शेतकºयांना कर्ज दिले जाणार आहे. परंतु जर थकबाकीदारांकडून असे प्रकार होत असतील तर एकप्रकारे ते अन्य गरजू शेतकºयांवर अन्यायकारक ठरणार असून, कर्जवसुलीत आडकाठी आणणाºया थकबाकीदारांबाबत लवकरच जिल्हा बॅँक ठोस धोरण स्वीकारणार असल्याचेही केदा अहेर यांनी सांगितले. मुकुंद वाजे यांच्याकडे सन २००६ पासून कर्ज थकले असून, त्यासाठी वेळोवेळी नोटिसाही देण्यात आल्याचे व पुरेसा वेळही दिला गेल्याचे सांगण्यात आले.
वसुलीचा तगादा
जिल्हा बॅँकेने मार्च अखेरीस बड्या व जुन्या थकबाकीदार शेतकºयांकडे कर्जवसुलीचा तगादा लावला असून, त्यातून वाहन कर्जापोटी ट्रॅक्टर जप्तीची मोहीम सुरू आहे. ऐपतदार शेतकºयांच्या मालमत्तांवर कर्जापोटी बोझा चढविण्याची प्रकियाही हाती घेण्यात आली आहे.

Web Title:  District bank will decide on debt relief on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.