सोसायट्यांना चुचकारण्याचे जिल्हा बॅँकेचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:24 AM2018-07-24T01:24:52+5:302018-07-24T01:25:07+5:30
जिल्हा बॅँकेकडे पीक कर्जासाठी शिफारशींसह प्रस्ताव सादर करणाऱ्या परंतु थकबाकी न भरणाºया जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांच्या आजी, माजी संचालकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई प्रस्तावित करणाºया जिल्हा बॅँकेच्या कारभाºयांविरोधात रोष प्रकट होत असतानाच आता बॅँकेने त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केला असून, त्यासाठी शंभर टक्के कर्ज परतफेड करणाºया सोसायट्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक : जिल्हा बॅँकेकडे पीक कर्जासाठी शिफारशींसह प्रस्ताव सादर करणाऱ्या परंतु थकबाकी न भरणाºया जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांच्या आजी, माजी संचालकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई प्रस्तावित करणाºया जिल्हा बॅँकेच्या कारभाºयांविरोधात रोष प्रकट होत असतानाच आता बॅँकेने त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केला असून, त्यासाठी शंभर टक्के कर्ज परतफेड करणाºया सोसायट्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅँकेच्या या पवित्र्याने गेल्या महिनाभरापासून सोसायटी संचालक व पदाधिकाºयांकडून बॅँकेविरुद्ध सुरू असलेली मोहीम काही प्रमाणात रोखण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे. बॅँकेचे चेअरमन केदा अहेर यांनी यासंदर्भात घोषणा केली. सोसायट्यांचा सत्कार करून अन्य सोसायट्यांपुढे कर्ज परतफेडीसाठी प्रोत्साहन देण्याचा त्यामागे हेतू आहे. दरम्यान, बागलाण तालुक्यातील लखमापूर येथील कै. भिका शंकर दळवी नागरी पतसंस्था अध्यक्षांनी बँकेच्या सामोपचार योजनेत सहभाग घेऊन संपूर्ण रकमेचा भरणा केल्याने बँकेने त्यांच्या जप्त मालमत्तेचा लिलाव स्थगित केला असल्याची माहिती देण्यात आली.