जिल्हा बँकेच्या जायखेडा शाखेला ठोकले टाळे
By admin | Published: April 25, 2017 01:59 AM2017-04-25T01:59:06+5:302017-04-25T01:59:21+5:30
जायखेडा : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून वेतनाची रक्कम मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बँकेच्या जायखेडा शाखेला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला
जायखेडा : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून वेतनाची रक्कम मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बँकेच्या जायखेडा शाखेला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला. त्यानंतर शाखाधिकाऱ्यांना समस्यांचे निवेदन देण्यात आले. वेतनाचे वितरण सुरळीत न केल्यास बँकेसमोर उपोषणास बसून आंदोलन करण्याचा निर्णय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यावेळी घेतला.
बागलाण तालुक्यातील जायखेडा व परिसरातील माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांचे व कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या काही महिन्यांपासून रखडल्याने विविध अडचणींचा सामना या कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. गेल्या डिसेंबर महिन्यापासून नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जायखेडा शाखेतून वेळेवर पगार मिळत नसल्याने शिक्षकांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. शासन मात्र याकडे सोईस्कर दुर्लक्ष करीत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी संतप्त कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून निवेदन दिले.
यावेळी संजय देसले, एम. बी. कापडणीस, ए. यू. बागुल, एस. डी. देवरे, एस. ए. गावित, बी. डी. बावा, के. आर. अभंग, वाय. एम. चौधरी, एम. व्ही. शिवदे, जे. ए. जगताप, एफ. पी. बोरसे, ए. एस. भाटेवाल, व्ही. वाय. पाटील, एस. जे. बच्छाव, बी. के. थैल, एस. एस. बावा, आर. एस. पाटील आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)