नाशकात २५ पासून जिल्हाबंदी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 12:24 AM2020-03-24T00:24:59+5:302020-03-24T00:25:37+5:30
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार नाशिकला बुधवारी (दि. २५) सकाळी ६ पासून जिल्हाबंदी लागू करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्णात संचारबंदी लागू करण्यात आली असून, केवळ जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठीच घराबाहेर पडण्याची परवानगी असून, अन्य नागरिकांनी ३१ मार्चपर्यंत घरातच राहणे बंधनकारक असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
नाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार नाशिकला बुधवारी (दि. २५) सकाळी ६ पासून जिल्हाबंदी लागू करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्णात संचारबंदी लागू करण्यात आली असून, केवळ जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठीच घराबाहेर पडण्याची परवानगी असून, अन्य नागरिकांनी ३१ मार्चपर्यंत घरातच राहणे बंधनकारक असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेतील प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भुजबळांनी ही माहिती दिली. नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना आणि बाहेरच्या नागरिकांना नाशिकमधून बाहेर किंवा बाहेरच्यांना जिल्ह्यात येण्यास पूर्णपणे प्रतिबंध करण्यात येणार आहे. तसेच शासन आदेशानुसार रिक्षात चालकाव्यतिरिक्त केवळ एक प्रवासी, तर कारमध्ये केवळ दोन प्रवाशांनाच परवानगी दिली जाणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता किरकोळ कारणांसाठी शहरात फिरणाºया वाहने व लोकांवर पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असेही भुजबळ म्हणाले. तसेच पेट्रोल पंपांवर दुचाकींना एकावेळी १०० रुपये, तर चारचाकींना केवळ १००० रुपयांचे पेट्रोल देण्याचे आदेश देण्यात आले असून पेट्रोल पंप हे सकाळी ८ ते ५ या वेळेतच सुरू ठेवले जातील. धार्मिक स्थळावर कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी नीलेश सागर उपस्थित होते.
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार
अन्न, धान्य, भाजीपाला, मेडिकल या सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने नियमितपणे सुरू राहणार आहेत. जनतेने केवळ तिथे गर्दी करू नये. बाजार समितीत तसेच भाजीपाला विक्र ीसाठी जागा निश्चित करून भाजीपाला खरेदीसाठी लोकांची गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. वैद्यकीय सेवा सुविधांसाठी सुरू असलेल्या वाहतूक करणाºया वाहनांना सेवेची मुभा राहणार आहे.