जिल्हाधिकाºयांचे आदेश : लासलगाव, सटाणा, नामपूर येथे बंद कांदा लिलावाबाबत संभ्रम कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 11:44 PM2017-09-17T23:44:44+5:302017-09-18T00:07:13+5:30
जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये गेल्या चार दिवसांपासून बंद असलेले कांदा लिलाव सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले असले तरी लासलगाव बाजार समितीमधील कांदा व्यापाºयांनी जागेचे कारण देत जिल्हाधिकाºयांच्या आदेशालाही वाटाण्याच्या अक्षदा लावण्याचे प्रयत्न सुरु केले असल्याने लिलावाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
नाशिक : जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये गेल्या चार दिवसांपासून बंद असलेले कांदा लिलाव सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले असले तरी लासलगाव बाजार समितीमधील कांदा व्यापाºयांनी जागेचे कारण देत जिल्हाधिकाºयांच्या आदेशालाही वाटाण्याच्या अक्षदा लावण्याचे प्रयत्न सुरु केले असल्याने लिलावाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमधील ८ बड्या कांदा व्यापाºयांवर गेल्या गुरुवारी प्राप्तिकर विभागाने अचानक छापे टाकल्याने कांदा व्यापाºयांचे धाबे दणाणले आहे. तीन दिवसांपासून जिल्ह्यातील बहुसंख्य बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बंद राहिल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बी.राधाकृष्णन् यांनी सोमवारपासून लिलाव सुरु न केल्यास व्यापाºयांचे परवाने रद्द करण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकाºयांच्या आदेशाची बाजारसमित्यांनी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला तरी व्यापारी लिलावात सहभागी होणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे.
कांदा खळ्यांमध्ये पाणी असल्यामुळे माल टाकण्यास जागाा नसल्याचे कारण लासलगाव येथील व्यापारीवर्गाने पुढे केले असल्याचे समजते. यामुळे सोमवारी लासलगाव येथील व्यापारी लिलावास सहभागी होतील की नाही याबाबत अद्याप संभ्रमावस्था आहे. नामपुर , सटाणा येथील बाजार समिती शुक्रवारपर्यंत बंद राहाणार असल्याचे बोलले जात आहे. मागील काही दिवसांत खरेदी केलेला कांदा अद्याप पडुन असल्याने त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याचे नामपूर येथील व्यापाºयाने सांगितले. याशिवाय नाणेटंचाई, आणि छापासत्राचीही व्यापाºयांमध्ये दहशत आहे.