रेल्वे भाडेवाढी विरोधात जिल्हा कॉँग्रेस आक्रमक
By admin | Published: June 24, 2014 08:54 PM2014-06-24T20:54:09+5:302014-06-26T01:01:11+5:30
मनमाड, नाशिकरोड, इगतपुरीला रेलरोको
नाशिक : भाजपाप्रणीत केंद्र सरकारने रेल्वे प्रवासी भाडेवाढ करून जनतेची घोर फसवणूक केली आहे. तसेच रासायनिक खतांच्या आणि साखरेच्या किमतीही वाढ होऊन महागाईत जनता होरपळत आहे. या वाढीमुळे देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढणार असून, ही भाववाढ गरीब जनतेवर अन्यायकारक असून, कॉँग्रेस या अन्यायकारक दरवाढीच्या विरोधात कॉँग्रेसच्या वतीने २५ जूनला जिल्'ात विविध ठिकाणी रेलरोका करण्याचा निर्णय कॉँग्रेसने घेतला आहे.
कॉँग्रेस कमिटीत जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली कॉँग्रेसची बैठक झाली. बैठकीत बोलताना राजाराम पानगव्हाणे यांनी सांगितले की, देशातील जनतेला ‘अच्छे दिन आयेंगे’चे स्वप्न दाखविणाऱ्या नरेंद्र मोदींनी प्रत्यक्षात विविध भाववाढ करून अच्छे दिन दूरच उलट महागाईच्या दरीत ढकलले आहे. यामुळे जनतेत मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असून, जनतेच्या विरोधी ही दरवाढ तत्काळ मागे घेण्यासाठी कॉँग्रेसच्या वतीने जिल्'ात तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी बैठकीस मोठाभाऊ भामरे, रमेश कहांडोळे, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, दिगंबर गिते, डॉ. ममता पाटील, सुनील आव्हाड, बबलू खैरे, दिगंबर गिते, विष्णुपंत बेंडकोळी, नितीन मोहिते, डॉ. आत्माराम कुंभार्डे, उत्तरा सोनवणे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)