जिल्हा परिषद कर्मचारी ७ रोजी संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 01:08 AM2018-08-03T01:08:19+5:302018-08-03T01:08:33+5:30
नाशिक : राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात अनेकदा चर्चा होऊनही अनेक मागण्या प्रलंबित असल्याने महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे कर्मचारी दि. ७ रोजी एक दिवसाचा संप पुकारणार आहेत, अशी माहिती कार्याध्यक्ष विजयकुमार हळदे यांनी दिली.
नाशिक : राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात अनेकदा चर्चा होऊनही अनेक मागण्या प्रलंबित असल्याने महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे कर्मचारी दि. ७ रोजी एक दिवसाचा संप पुकारणार आहेत, अशी माहिती कार्याध्यक्ष विजयकुमार हळदे यांनी दिली.
लिपिक, लेखा, परिचर, वाहनचालक तसेच आरोग्य कर्मचाºयांच्या वेतनत्रुटी दूर करून नंतरच सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, आयोग लागू होण्यापूर्वी २५ हजार अग्रीम देण्यात यावे, अंशदान पेन्शन योजना रद्द करून तत्काळ पूर्ववत पेन्शन योजना लागू करावी, ग्रामविकास विभागाने सुधारित आकृतिबंधात पदे कमी करू नयेत. एमडीएस केडरमधून वर्ग दोनच्या पदोन्नतीची पदे तत्काळ भरण्यात यावीत, ग्रामविकास विभागाने ४ जून २०१८ कनिष्ठ सहायक या पदाचे पदोन्नतीच्या धोरणातील पदवीधरची अट रद्द करण्यात यावी, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत वाहनचालकांची पदे भरण्यात यावीत, जिल्हा परिषदेमधील करार, कंत्राटी पद्धतीने वर्षानुवर्ष कार्यरत कर्मचाºयांना कायम करण्यात यावे, केंद्रीय कर्मचाºयांप्रमाणेच दिला जाणारा १४ महिन्यांचा महागाई भत्ता तत्काळ रोखीने देण्यात यावा आदी विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर जात आहेत.
याबाबतचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांना देण्यात आले असून, पत्रकावर राज्य संघटनेच्या नाशिक शाखेचे कार्याध्यक्ष विजयकुमार हळदे, अध्यक्ष वसंत डोंगरे, दिनकर सांगळे, राजेश ठाकूर, चंद्रशेखर फसाळे, महेंद्र पवार, सचिन विंचुरकर, प्रमोद निरगुडे, रत्नाकर अहिरे, जितेंद्र राठोड, उदय लोखंडे, डॉ. वाघमोडे, डॉ. संतोष पजई, डॉ. भगवान ताडगे आदींच्या स्वाक्षºया आहेत.