जिल्हा परिषद अध्यक्ष; उपाध्यक्षपदाची आज निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 12:35 AM2020-01-02T00:35:57+5:302020-01-02T00:36:16+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी गुरुवारी सकाळी ११ वा. बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक महाविकास आघाडीकडून एकत्रित लढण्याचे पक्षश्रेष्ठींच्या सूचना असल्या तरी, प्रत्यक्षात कॉँग्रेसला सोबत घेण्यास शिवसेना तयार नसल्याने गुंता वाढला आहे. दुसरीकडे ज्याची सदस्यसंख्या जास्त त्याला अध्यक्षपद या न्यायाने शिवसेनेला अध्यक्षपद व राष्टÑवादीला उपाध्यक्षपद देण्यावर मात्र दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

निवडणुकीत अध्यक्षपदाचा उमेदवार कोण यावरून शिवसेनेची दमछाक झाली असून, ज्यांच्या नावाची चर्चा अध्यक्षपदासाठी होत होती, त्या नावाला राष्टÑवादीच्या एका गटाचा विरोध असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत सेनेचा उमेदवार ठरू शकला नाही. (पान ५ वर)महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी, शिवसेनेने अध्यक्ष व पदाधिकारी निवडीत कॉँग्रेसला सोबत घेण्यास नकार दिला आहे. त्यामागे महापौर निवडणुकीत कॉँग्रेसने घेतलेल्या भूमिकेला सेनेचा आक्षेप आहे. आघाडीचा धर्म कॉँग्रेसने का पाळला नाही, असा सवाल सेना करीत आहे. कॉँग्रेसचे नेते माजी आमदार अनिल आहेर यांच्यासह शिष्टमंडळाने राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेऊन निवडणुकीसाठी कॉँग्रेसला सभापतिपद मिळण्याची मागणी केली. त्यावर भुजबळ यांनी शिवसेनेने कॉँग्रेसविषयी व्यक्त केलेले मत त्यांच्या कानी घातले.