लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 02:25 PM2019-11-27T14:25:23+5:302019-11-27T14:25:32+5:30
नांदूरवैद्य -: इगतपुरी तालुक्यातील निनावी येथे जिल्हा परिषद शाळेच्या नुतन इमारतीचा सोहळा अमरज्योती ट्रस्टचे वासुदेव बत्रा यांच्या हस्ते कोनशिळेचे उद्घाटन करण्यात आले.
नांदूरवैद्य -: इगतपुरी तालुक्यातील निनावी येथे जिल्हा परिषद शाळेच्या नुतन इमारतीचा सोहळा अमरज्योती ट्रस्टचे वासुदेव बत्रा यांच्या हस्ते कोनशिळेचे उद्घाटन करण्यात आले.
इगतपुरी तालुक्यातील निनावी येथील जिल्हा परिषद शाळा अनेक दशकांपासून विद्यार्थ्यांना ज्ञान अमृताचे धडे देण्याचे काम करीत असून शिक्षणाचा मार्ग अधिक सुकर होण्यासाठी मुंबईतील अमरज्योती ट्रस्टच्या माध्यमातून एक कोटी २५ लाख रु पयाची दिव्य इमारत मिळाली आहे. यासाठी निनावीचे सरपंच गणेश टोचे यांनी पाठपुरावा केल्यामुळे हे यश मिळाले आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्र माच्या माध्यमातून लेझीम नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली.यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्र म पार पाडण्यासाठी मुख्याद्यापिका पुष्पलता धवल चव्हाण, सोनवणे, दत्तात्रय बोरसे, चोथवे, गोवर्धने, सूर्यवंशी, खैरनार, संगिता गरु ड आदी शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले आहे.
याप्रसंगी नारायण पंजाबी, अॅड.अमर गारेवाल, कपिल खोबाडिया, इगतपुरीचे सहायक गटविकास अधिकारी वेदे, बाळकृष्ण मोरे, प्राथमिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती नाठे, ग्राम अधिकारी एच.एस.बंजारा, सरपंच गणेश टोचे, उपसरपंच जिजाबाई भगत, शालेय समतिीचे अध्यक्ष रामनाथ टोचे, एकनाथ म्हसाळ, मधुकर टोचे, अशोक फोडसे, निलेश भुतडा, विनोद चावला, बाळू टोचे, लालू गारे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
-----------------
शैक्षणकि गुणवत्ता सुधारण्यासाठी जिल्हा परिषद शाळांचे विशेष योगदान आहे. तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक हे उच्च गुणवत्ताधारक असल्यामुळे भौतिक सुधारणा घडवून शाळेचा दर्जा उंचावत आहे. यामुळे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी आपले पाल्य जिल्हा परिषद शाळेत पाठवावे.
- डॉ. वैशाली झनकर, शिक्षणाधिकारी
------------------