जिल्हा शिक्षण, प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी वेतनाविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 12:08 AM2020-09-23T00:08:00+5:302020-09-23T00:59:39+5:30
नाशिक- शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत काम करणाऱ्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या राज्यातील सुमारे 900हून अधिक कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्यापासून वेतन झालेले नसून, शासनाने वेतन अनुदान न दिल्यामुळे या कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
नाशिक- शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत काम करणाऱ्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या राज्यातील सुमारे 900हून अधिक कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्यापासून वेतन झालेले नसून, शासनाने वेतन अनुदान न दिल्यामुळे या कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रत्येक जिल्'ात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय स्तरीय प्रशिक्षण, संशोधन, अभ्यासक्रम विकसन, मूल्यमापन इत्यादी बाबत शिखर संस्था म्हणून काम करते. या संस्थेत ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, लेखापाल, लघुलेखक, कार्यशाळा सहाययक, ग्रंथपाल, सांख्यिकी सहाय्यक, लिपिक, शिपाई असे अनेक पदे कार्यरत आहेत. मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने या कर्मचाºयांच्या वेतनातून 25 ते 30 टक्के रक्कम कपात करून ती गणेशोत्सव काळात देण्याचे कबूल केले. प्रत्यक्ष ही रक्कम तर मिळालीच नाही, उलट मे महिन्यापासून नियमित वेतन देखील अनुदानाअभावी बंद करण्यात आले आहे. गेल्या पाच महिन्यापासून कर्मचारी वेतनाची व अनुदानाची प्रतीक्षा करीत असून, या काळात घरांचे हप्ते, मुलं बाळांचे शिक्षण, आजारपण, घरखर्च, शासनाचे देयके भरणे देखील मुश्कील झाले आहे. शिवाय कोरोनाचे संकट डोक्यावर असून, एखादा कर्मचारी बाधित झाल्यास त्याच्यावर उपचार कसे करायचे हा प्रश्न भेडसावू लागला आहे.
या कर्मचाºयांनी नियमित वेतन मिळावे तसेच मार्च महिन्यातील कपातीची रक्कम मिळावी यासाठी शासन पातळीवर प्रयत्न चालविले असले तरी मंत्रालयातील अधिकारी दाद देत नाहीत. त्यामुळे बुधवारपासून या कर्मचाºयांनी कामावर बहिष्कार टाकणे, संप, निदर्शने, उपोषण करण्याचा इशारा रत्नप्रभा भालेराव, योगेश सोनवणे, भारती बेलन, सुनिल बाविस्कर, राजेंद्र बागुल, संतोष गायकवाड, सुनीता पाटील आदींनी दिला आहे.