मराठा मोर्चासाठी जिल्हाभर एल्गार

By admin | Published: September 21, 2016 11:57 PM2016-09-21T23:57:14+5:302016-09-21T23:57:31+5:30

देवळा, खामखेड्यात मोटारसायकल रॅली : ठिकठिकाणी बैठकांचे आयोजन

District Elgar for Maratha Morcha | मराठा मोर्चासाठी जिल्हाभर एल्गार

मराठा मोर्चासाठी जिल्हाभर एल्गार

Next


नाशिक : कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ नाशिकमध्ये शनिवारी (दि. २४) काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मूकमोर्चाच्या प्रचार- प्रसारासाठी जिल्ह्यात मोटारसायकल रॅलींबरोबरच ठिकठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.
खामखेडा येथे रॅलीचे स्वागत
खामखेडा : नाशिक येथे काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मूकमोर्चाला देवळा तालुक्यातून मराठा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी मोर्चाच्या जनजागृतीसाठी संपूर्ण देवळा तालुकाभर निघालेल्या मोटारसायकल रॅलीचे खामखेडा येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. नाशिक येथे निघणाऱ्या मूकमोर्चात कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्यावी, या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी, अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्यासाठी, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आदि मागण्यांसाठी नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा समाजाचा मूकमार्चा नेण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी या मोर्चाची संपूर्ण वाडी-वस्तीवर जनजागृती होऊन तालुक्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे म्हणून मोटार-सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत असंख्य दुचाकीस्वार सहभागी झाले होते.

देवळा तालुक्यात रॅलीमध्ये युवकांचा सहभाग लक्षणीय

देवळा : नाशिक येथे आयोजित मराठा क्रांती मूकमोर्चासाठी देवळा तालुक्यात जोरदार तयारी करण्यात येत असून, तालुक्यातून मोटारसायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली. बुधवारी सकाळी ९ वाजता देवळ्याचे ग्रामदैवत दुर्गामाता मंदिरापासून रॅलीस प्रारंभ झाला. श्रीमती जनाबाई अहेर यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. त्याआधी उरी येथे अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
देवळा येथून सुरू झालेली ही रॅली मटाणे, वरवंडी, भऊर, विठेवाडी, सावकी, लोहोणेर, खालप, वासूळ, महालपाटणे, निंबोळा, डोंगरगाव, मेशी, खडकतळे, पिंपळगाव, दहिवड, वाखारी, वाखारवाडी, खुंटेवाडी, गुंजाळनगर, रामेश्वर, मकरंदवाडी, कापशी, भावडे, वडाळे, कणकापूर, शेरी वार्शी, खर्डा, वाजगाव व शेवटी देवळा येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीच्या प्रारंभी बाजार समितीचे संचालक योगेश अहेर यांनी मोटारसायकल चालकांना व सहभागी युवकांना शिस्तीचे पालन करावे व रॅली शांततेत पार पाडावी, असे आवाहन केले.
देवळा तालुक्यात मोटारसायकल रॅली काढून गावागावात मराठी समाजबांधवांनी मोर्चात सहभाग घ्यावा यासाठी जनजागृती मोहीम
राबवून तालुका पिंजून काढण्यात आला.
नाशिक येथे मोर्चासाठी देवळा येथून
सकाळी साडेसात वाजता शिवाजी पुतळ्यापासून मार्गस्थ होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (लोकमत चमू)

देवळा तालुक्यात बैठकांचे नियोजन
देवळा : गावागावातून वाहनांची व्यवस्था करणे,मोर्चा संबंधित होर्डिंग्ज लावणे,मोर्चात सहभागी होणार्या सर्वांनी पाळावयाच्या नियमांची माहिती देणे,आर्थिक नियोजन करणे आदि कामांची जबाबदारीचे नियोजन करण्यात आले असुन देवळा नगरपंचायतीच्या नगरसेवकांना त्यांच्या प्रभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नाशिक येथील मुक मोर्चा शिस्तीने व शांततेने पार पाडावा,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपआपल्या वाहनात करावी,पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फेकू नये,पान तंबाखु खाउन थुंकुन अस्वच्छता करु नये असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सोशल मिडियातून मोर्चा संदर्भात सतत ताज्या घडामोडी प्रसिद्ध केल्या जात आहेत. ह्या मोर्चाला तालुक्यातील इतर समाजबांधवांचा पाठींबा मिळत आहे.तालुक्यातील मुस्लिम समाजबांधव , तसेच जैन ,लाडशाखीय वाणी आदी समाजबांधवांनी मुक मोर्चास पाठींबा दिला आहे. देवळा मर्चंटस को आॅप.बँकेने मराठा क्र ांती मोर्चाच्या दिवशी म्हणजे दि.24 सप्टेंबर रोजी होणारी नियोजित वार्षिक सर्वसाधारण सभा पुढे ढकलुन ती आता २६ सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असुन मोर्चास त्यांनी पाठिंबा दिला आहे.ह्या मोर्चासाठी आपले अंतर्गत मतभेद दूर ठेवून तालुक्यातील सर्विपक्षय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, मराठी युवक नागरीक स्वयंस्फुर्तीने सहभागी होत आहेत. मोटारसायकल र?लीप्रसंगी नगरसेवक जितेंद्र अहेर ,लक्ष्मीकांत अहेर ,संभाजी अहेर ,उपसरपंच भाउसाहेब पगार ,शिवमुद्रा गृपचे अध्यक्ष रजत अहेर ,मोरया प्रतिष्ठाणचे अध्यक्ष उमेश अहेर ,शिवसेनेचे अशोक अहेर ,शिवराजे मित्रमंडळाचे अध्यक्ष किरण अहेर ,छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष आण्णा अहेर,विजय शिंदे ,संतोष शिंदे ,देवा भामरे ,राजेश अहेर ,दिलिप अहेर ,दिनकर अहेर ,बालू सुर्यवंशी,आभिजित शिंदे,सतिश सुर्यवंशी,शरद खैरणार,काकाजी शिंदे,मिलेश निकम आदिंसह कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.
जिल्ह्यातील बाजार समित्या राहणार बंद
पिंपळगाव बसवंत/लासलगाव : नाशिक येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी शेतकरी बांधवांना मोर्चात सहभागी व्हावयाचे असल्याने शेतकऱ्यांच्या विनंतीवरून शनिवारी (दि. २४) संपूर्ण दिवस पिंपळगाव बसवंतसह जिल्ह्यातील बाजार समित्या बंद राहणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज, खरेदी-विक्र ी आदि व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी दिली.
सदर मोर्चास नाशिक जिल्ह्यातील विविध तालुके, गावे, परिसर व भागामधून लाखो मराठा समाज उपस्थित राहणार आहे. सदर समाज बांधवांना मोर्चास उपस्थित राहता यावे याकरिता शेतकरी बांधवांच्या विनंतीवरून तसेच संपूर्ण दिवसभर नाशिक जिल्ह्याच्या विविध भागातून मोर्चकरी वाहनांची ये-जा होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होणार आहे.
इतर जिल्ह्यातून येणारे मालवाहतूक ट्रक, कंटेनर आदिंचे मार्ग बदलण्यात
येणार आहे किंवा वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी काढलेला शेतमालाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने व शेतमालाची वाहतूक करता येणार नाही. बाजार समितीचे सर्व संबंधित घटक,
व्यापारी, आडते, हमाल-मापारी, कर्मचारी आदिंनाही मोर्चात सहभागी
व्हावयाचे आहे. पिंपळगाव बसवंत शहर संपूर्णपणे बंद राहणार असल्याचेही बनकर यांनी सांगितले.
 

Web Title: District Elgar for Maratha Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.