राष्ट्रीय सेवा योजनेत जिल्हा उत्कृष्ट
By Admin | Published: June 20, 2016 11:14 PM2016-06-20T23:14:09+5:302016-06-20T23:25:21+5:30
पुणे विद्यापीठ : नीलिमा पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण
देवळाली कॅम्प : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आव्हान २०१६ या आपत्ती व्यवस्थापन राज्यस्तरीय शिबिरात उत्तम काम केल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या संघाला उत्कृष्ट जिल्हा म्हणून गौरविण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू, महाराष्ट्राचे रासेयोचे संपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंके व राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. संजयकुमार दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत १० दिवसांचे शिबिर संपन्न झाले. या शिबिरात एनडीआरएफच्या जवानांनी ३६ जिल्ह्यातून सुमारे १२०० रासेयोच्या स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे देहू येथील गाथा मंदिराशेजारील इंद्रायणीचा काठावर वॉटर रेस्क्यूचे प्रशिक्षण दिले. लॅमरोड येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विविध महाविद्यालयांचे ७० विद्यार्थी निवडीसाठी सहभागी झाले होते. त्यापैकी ३० विद्यार्थ्यांची निवड प्राचार्या डॉ. जे. डी. सोनखासकर, रासेयोचे जिल्हाप्रमुख प्रा. विक्रम काकुळते, रासेयोचे विभागप्रमुख डॉ. डी.के. आहेर, प्रा. डी. एस. बोराडे यांची निवड केली. नाशिक जिल्ह्याच्या उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना संघाचा सत्कार मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार व संचालक रवींद्र देवरे यांच्या हस्ते करण्यात आला. या संघाचे नेतृत्व प्रा. विक्रम काकुळते, प्रा. गणेश पाटील व प्रा. एल.डी. जाधव यांनी केले. यावेळी रासेयोच्या विद्यापीठ सल्लागार समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे, प्राचार्या डॉ. जे. डी. सोनखासकर, प्राचार्य डॉ. व्ही.जे. मेधाने, प्राचार्य डॉ. एस.एस. काळे, रासेयोचे जिल्हाप्रमुख प्रा. विक्रम काकुळते व प्रा. रवींद्र अहिरे, प्रा.एन.के. पवार, प्रा. नंदू नवले, प्रा. झोटिंग आदि उपस्थित होते. (वार्ताहर)