जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येने शंभरी ओलांडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 01:53 AM2018-12-08T01:53:12+5:302018-12-08T01:53:27+5:30
कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकºयांनी शंभरी ओलांडली असून, नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे एका महिला शेतकºयानेही आत्महत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती दौºयावर असताना बागलाण तालुक्यात शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
नाशिक : कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकºयांनी शंभरी ओलांडली असून, नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे एका महिला शेतकºयानेही आत्महत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती दौºयावर असताना बागलाण तालुक्यात शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
सरकारने गेल्या वर्षी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकºयांचे सरसकट दीड लाखापर्यंतचे कर्जमाफ केलेले असतानाही डिसेंबरअखेर १०५ शेतकºयांनी आत्महत्या केल्या. यंदाही त्याच दिशेने वाटचाल सुरू असून, जानेवारी महिन्यापासून आजपावेतो दरमहा साधारणत: नऊ ते दहा शेतकरी आत्महत्या करीत आहेत. नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे मंगलाबाई बाबासाहेब पवार (३९) या शेतकरी महिलेने नोव्हेंबर महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.
या महिलेच्या नावावर शेती असली तरी, तिने कौटुंबिक कारणावरून आत्महत्या केली असावी, असा अंदाज बांधून पोलिसांनी त्यादृष्टीने तपास केला. परंतु चौकशीअंति तिच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कारण नसल्याचे स्पष्ट झाल्याचा अहवाल शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला, तर नाशिक तालुक्यातील दोनवाडे येथील सांगळे नामक शेतकºयाने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाला मिळाली आहे. गुरुवारी दुपारी बागलाण तालुक्यातील भडाणे येथील तात्याभाऊ साहेबराव खैरनार (४४) या शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली असून, त्याच्या नावे २.१० हेक्टर शेतजमीन असून, त्याच्या आत्महत्येमागचे कारणाचा शोध घेतला जात आहे. या तिघा शेतकºयांच्या आत्महत्येने जिल्ह्णाची संख्या १०१ वर पोहोचली आहे.