जिल्हा रुग्णालय : वैद्यकिय सेवेला सशस्त्र जवानांचे ‘सुरक्षा कवच’
By admin | Published: March 25, 2017 04:33 PM2017-03-25T16:33:45+5:302017-03-25T16:33:45+5:30
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात काही दिवसांपुर्वीच एका रुग्णाच्या उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूनंतर डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटना घडली होती.
नाशिक : रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ डॉक्टरांनी राज्यभर पुकारलेल्या संपानंतर सरकारने डॉक्टरांना पोलीस संरक्षण दिले आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात काही दिवसांपुर्वीच एका रुग्णाच्या उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूनंतर डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे आदींनी गेल्या शुक्रवारी भेट देऊन येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त वैद्यकिय अधिकारी डॉ. गजानन होले आदिंशी चर्चा केली होती. जिल्हा शासकिय रुग्णालयामध्ये पोलीस बीट मार्शल दर तासाला गस्त घालतील व पोलीस जवानांची अतिरिक्त सुरक्षा पुरविली जाईल, असे आश्वासन दिले होते. यानंतर शनिवारी नाशिकच्या जिल्हा शासकिय रुग्णालयात अतिरिक्त दोन सशस्त्र पोलीस जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे.