जिल्हा रुग्णालयातील इन्क्युबेटर वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 01:35 AM2017-09-10T01:35:41+5:302017-09-10T01:35:52+5:30
जिल्हा रुग्णालयातील एनआयसीयू युनिटमध्ये उपचार सुरू असलेल्या नवजात अर्भकांच्या वाढत्या मृत्यूची गंभीर दखल घेत राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शनिवारी (दि़ ९) अचानक जिल्हा रुग्णालयास भेट देत एनआयसीयू युनिटची तपासणी केली़ नवजात अर्भकांचे वाढते मृत्यू लक्षात घेता केंद्र शासनाचे निकष बाजूला सारत सद्यस्थितीत आणखी पाच ते सात व महिनाभरात आणखी पाच ते सात अशा सुमारे चौदा इन्क्युबेटरची संख्या वाढविण्यात येणार असून, पीडिअॅट्रिक व्हेंटिलेटर पुरविण्याची ग्वाही दीपक सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली़
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील एनआयसीयू युनिटमध्ये उपचार सुरू असलेल्या नवजात अर्भकांच्या वाढत्या मृत्यूची गंभीर दखल घेत राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शनिवारी (दि़ ९) अचानक जिल्हा रुग्णालयास भेट देत एनआयसीयू युनिटची तपासणी केली़ नवजात अर्भकांचे वाढते मृत्यू लक्षात घेता केंद्र शासनाचे निकष बाजूला सारत सद्यस्थितीत आणखी पाच ते सात व महिनाभरात आणखी पाच ते सात अशा सुमारे चौदा इन्क्युबेटरची संख्या वाढविण्यात येणार असून, पीडिअॅट्रिक व्हेंटिलेटर पुरविण्याची ग्वाही दीपक सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली़
जिल्हा रुग्णालयातील एनआयसीयू (स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट) मध्ये गत पाच महिन्यांत १८७, तर आॅगस्टमध्ये ५५ तर सप्टेंबरमध्ये १५ अर्भकांचा मृत्यू झाला
आहे़ या विभागात उपचारासाठी दाखल करण्यात येणाºया नवजात अर्भकांच्या संख्येमुळे विभागातील १८ इन्क्युबेटरमध्ये प्रत्येकी चार अर्भक ठेवली जात असल्याचे वास्तव प्रसिद्धी माध्यमांनी समोर आणले होते़ याबाबत शुक्रवारी (दि़८) मंत्रालयात बैठक झाल्यानंतर शनिवारी डॉ़ सावंत यांनी जिल्हा रुग्णालयास आरोग्य सचिवांसह अचानक भेट देऊन एनआयसीयू युनिटची पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली़ यावेळी, डॉ़ सावंत यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाºया नवजात अर्भकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, २०११ मध्ये २८ हजार, २०१२ मध्ये ३५ हजार तर सद्यस्थितीत प्रतिवर्षी ५० हजार इतकी झाली आहे़ धुळे, नंदुरबार, जव्हार, वाडा, मोखाडा या ठिकाणांसह तीनशे किलोमीटरहून बालके या ठिकाणी उपचारासाठी दाखल केली जातात़ जिल्ह्णातील ५६ टक्के तर बाहेरील जिल्ह्णातील ४४ टक्के नवजात बालके जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असून, बाहेरील मुलांमध्ये इन्फेक्शनचे प्रमाण अधिक असते़ त्यात ५०० ग्रॅम व एक किलोच्या आत वजन असलेल्या अर्भकांची संख्या अधिक असल्याने त्यांना वाचविणे हे डॉक्टरांसमोर आव्हान असते़ बालमृत्यूबाबत आपण अधिक संवेदनशील असून, पालघर जिल्ह्णाचा बालमृत्यूदर ९४ हून १३ पर्यंत कमी करण्यात यश आले आहे़ याच धर्तीवर नाशिक जिल्हा रुग्णालयासाठी केंद्र शासनाचे निकष बदलून इन्क्युबेटरची संख्या १४ ने वाढविली जाईल तसेच पीडिअॅट्रिक व्हेंटिलेटर पुरविण्याची ग्वाही आरोग्यमंत्री सावंत यांनी दिली़ यावेळी आमदार जयंवत जाधव, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार, संदर्भ रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एन. गुठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, विजय करंजकर आदी उपस्थित होते. नवजात अर्भकांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र इमारत बांधली जाणार असून, त्यासाठी २१ कोटी रुपयांचा निधीही शासनाने मंजूर केलेला आहे़ मात्र, या इमारतीसाठी असलेला वृक्षांचा अडथळा येत्या आठ दिवसांत दूर करून तोडगा काढला जाणार आहे़ याबाबत मुख्यमंत्री व आरोग्य सचिव महापालिका आयुक्तांशी बोलले असून, हा अडथळा दूर होऊन लवकरच कामास सुरुवात होईल, असे आरोग्यमंत्री सावंत यांनी सांगितले़ परजिल्ह्णातून उपचारासाठी दाखल केल्या जाणाºया अर्भकांमध्ये इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात असून ते कमी करण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे़ या अर्भकांना इन्क्युबेटरमध्ये ठेवले जात असून, केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे द्वितीय श्रेणीतील रुग्णालयांमध्ये केवळ १४ इन्क्युबेटरला मान्यता असते़ मात्र जिल्हा रुग्णालयातील अर्भकसंख्या पाहता येत्या केंद्राचे निकष तोडून सद्यस्थितीत असलेल्या एनआयसीयू युनिटच्या शेजारच्या वॉर्डमध्ये आणखी पाच ते सात व महिनाभरात आणखी पाच ते सात असे चौदा इन्क्युबेटर लावले जाणार आहेत़ केंद्राच्या निकषाप्रमाणे तृतीय श्रेणीतील अर्थात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पीडिअॅट्रिक व्हेंटिलेटरची सुविधा दिली जाते़ नाशिक जिल्हा रुग्णालय द्वितीय श्रेणीत असले तरी भविष्यात राज्य शासन पीडिअॅट्रिक व्हेंटिलेटर पुरवेल़ तसेच जिल्हा रुग्णालयातील लहान मुलांच्या उपचारासाठीच्या स्वतंत्र इमारतीचे कामकाज लवकरच सुरू करण्याची ग्वाही आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली़ अर्भक मृत्यूस कमी वजन व शेवटच्या श्रेणीत दाखल झाल्याचे सांगत जिल्हा रुग्णालय व कर्मचाºयांची पाठराखण करून या ठिकाणी उपचारापासून कोणालाही वंचित ठेवले जात नसल्याची कडी केली़