जिल्हा बॅँक-जिल्हा प्रशासनात तू तू-मैं मैं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 01:51 AM2019-05-04T01:51:56+5:302019-05-04T01:52:15+5:30
थकबाकी वसुलीपोटी शेतकऱ्यांच्या जमिनींवर अगोदरच विविध कार्यकारी सोसायट्यांनी बोजा चढविलेला असताना पुन्हा त्यावर जिल्हा बॅँकेचे नाव लावून शेतकºयांना अडचणीत आणणे, शासनाने दिलेल्या दुष्काळी मदतीची रक्कम बॅँकेने अनामत म्हणून जमा करून घेणे यांसह शेतकºयांशी संबंधित अनेक प्रश्नांवर होत असलेल्या तक्रारीवर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन व बॅँक व्यवस्थापनाच्या झालेल्या बैठकीत तू तू-मैं मंै झाली. शेतकºयांचे पैसे अडकविल्यास बॅँकेच्या कर्मचाºयांना निलंबित करण्याचा इशारा प्रशासनाने देताच, बॅँकेच्या अध्यक्षांनीदेखील राजीनामा देण्याची भाषा करून शासनाकडून प्रशासकाची नेमणूक करून आणण्याची तयारी दर्शविली.
नाशिक : थकबाकी वसुलीपोटी शेतकऱ्यांच्या जमिनींवर अगोदरच विविध कार्यकारी सोसायट्यांनी बोजा चढविलेला असताना पुन्हा त्यावर जिल्हा बॅँकेचे नाव लावून शेतकºयांना अडचणीत आणणे, शासनाने दिलेल्या दुष्काळी मदतीची रक्कम बॅँकेने अनामत म्हणून जमा करून घेणे यांसह शेतकºयांशी संबंधित अनेक प्रश्नांवर होत असलेल्या तक्रारीवर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन व बॅँक व्यवस्थापनाच्या झालेल्या बैठकीत तू तू-मैं मंै झाली. शेतकºयांचे पैसे अडकविल्यास बॅँकेच्या कर्मचाºयांना निलंबित करण्याचा इशारा प्रशासनाने देताच, बॅँकेच्या अध्यक्षांनीदेखील राजीनामा देण्याची भाषा करून शासनाकडून प्रशासकाची नेमणूक करून आणण्याची तयारी दर्शविली.
जिल्हा बॅँकेने थकबाकी दारांविरुद्ध कडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी थकबाकीदारांच्या मालमत्तेवर बोजा चढविणे, प्रसंगी लिलाव करून वसुली करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर थकबाकीदारांचे अन्य बॅँकेत असलेले खातेदेखील सील करण्याची कार्यवाही सुरू आहे. शासनाने शेतकºयांच्या खात्यावर अनुदानाचे पैसे जमा केले. (पान १० वर)
(पान १ वरून)
त्यातील काही रक्कम बॅँकेने परस्पर जमा करून घेण्यास सुरुवात केली आहे.
बॅँकेच्या या सर्व कार्यवाहीच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तसेच शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन बॅँकेच्या जुलमी कारवाईविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी केली होती. त्यापार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या दालनात जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर, कार्यकारी संचालक सतीश खरे यांची बैठक घेण्यात आली. यावेळी खेडकर यांनी शेतकºयांच्या सातबारा उताºयावर बॅँकेचा बोझा कशाच्या आधारे चढविला जातो, अशी विचारणा केली. जर विकासो संस्थेने शेतकºयाची जमीन तारण घेऊन कर्ज वितरण केले आहे व तसा करार केला आहे, तर बॅँकेचा थेट संबंध येतो कोठे, असा सवाल केला. त्यावर बॅँकेने सारवासारव करून, यापुढे तसे न करण्याची हमी दिली. त्याचबरोबर शेतकºयांच्या अनुदानाची रक्कम कशाच्या आधारे परस्पर बॅँक जमा कशी करून घेऊ शकते? सदर रक्कम शासनाची असून, तसे केल्यास बॅँकेच्या कर्मचाºयाला निलंबित करण्याची तंबी खेडकर यांनी दिली. जे धनाढ्य आहेत व कर्ज फेडत नाही अशा शेतकºयांवर बॅँकेने कारवाई करावी, परंतु सध्या दुष्काळाच्या परिस्थितीशी झगडणाºया गरीब शेतकºयाविषयी बॅँकेने नरमाई दाखवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात येऊन काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
चौकट====
शेतकºयांची कर्जफेडीची नाही मानसिकता
बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी, कर्जदार शेतकºयांची प्रशासनाने बाजू घेऊ नये, नाहीतर बॅँकेच्या ठेवीदारांना थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवू असे सांगून, बॅँकेत दररोज घेणेकरी येत असून, त्यांना पैसे देण्यासाठी वसुलीसाठी पर्याय नाही. प्रशासन जर सहकार्य करणार नसेल तर आपण राजीनामा देऊ व अन्य जिल्हा बॅँकांप्रमाणे नाशिक बॅँकेवर प्रशासकाची नेमणूक करून आणू, असा निर्वाणीचा इशारा दिला. कर्जदार शेतकºयांकडे पैसे असूनही त्यांची कर्जफेडीची मानसिकता नाही अशा शेतकºयांच्या विरोधात बॅँकेची कारवाई सुरूच राहील यावर ते ठाम राहिले.
चौकट===
६०० थकबाकीदारांवर कारवाई करणार
जिल्हा बॅँकेने मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार केली असून, त्यात नाशिक व निफाड सहकारी साखर कारखान्याचे आजी-माजी संचालकांबरोबरच, आर्मस्ट्रॉँग कंपनीचे संचालक भुजबळ कुटुंबीयांचाही समावेश आहे. लवकरच या सर्वांच्या मालमत्ता जप्तीची प्रकिया सहकार विभागामार्फत सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बॅँकेचे माजी अध्यक्ष देवीदास पिंगळे यांच्या आनंद अॅग्रो कंपनीच्या मालमत्ता जप्तीवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्याचेही बॅँक व्यवस्थापनाने सांगितले.