शासकीय योजनांची माहीती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी नाशिकमध्ये मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 05:38 PM2018-01-30T17:38:14+5:302018-01-30T17:57:06+5:30

न्यायापासून कोणीही वंचीत राहू नये यासाठी जिल्हा परिषद, तहसिल, समाजकल्याण, जिल्हा उदयोग केंद्र , वनविभाग, यांच्यासह विविध विभागांच्या योजनाजनसामान्यांपयर्ंत पोहचल्या पाहिजे. प्रत्यक्षात लाभ मिळेपर्यंत पाठ पुरावा केला पाहिजे व दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी प्रशासनाला सोबत घेऊन विधी सेवा प्राधिकरणाने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष्य सुर्यकांत शिंदे यांनी केले. 

District Law Service Authority organized a government scheme in Nashik to bring the details of the schemes to the grassroot | शासकीय योजनांची माहीती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी नाशिकमध्ये मेळावा

शासकीय योजनांची माहीती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी नाशिकमध्ये मेळावा

Next
ठळक मुद्देनाशिकमध्ये शासकीय योजना मेळावायोजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी उपक्रमन्याय्य हक्कापासून कोणीही वंचीत राहू नयेजिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष्य सुर्यकांत शिंदे यांचे मत

नाशिक : न्याय सर्वांसाठी आहे. न्यायापासून कोणीही वंचीत राहू नये यासाठी जिल्हा परिषद, तहसिल, समाजकल्याण, जिल्हा उदयोग केंद्र , वनविभाग, यांच्यासह विविध विभागांच्या योजनाजनसामान्यांपयर्ंत पोहचल्या पाहिजे. प्रत्यक्षात लाभ मिळेपर्यंत पाठ पुरावा केला पाहिजे व दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी प्रशासनाला सोबत घेऊन विधी सेवा प्राधिकरणाने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष्य सुर्यकांत शिंदे यांनी केले. 
नाशिक येथील बी.डी.भालेकर मैदानावर आयोजित शासकीय योजानांच्या मेळाव्याचे उदघाटन पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष्य सुर्यकांत शिंदे, मनपा आयुक्त अभिशेक कृष्णा, जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे,जिल्हा वकील संघचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, अॅड.अजय मिसर, जिल्हा सत्र न्यायाधीश यु. एम. नंदेश्वर मॅडम, मुख्य न्यायदंडाधिकारी एस.टी.डोके आदी उपस्थित होते. यावेळी सूर्यकांत शिंदे यांनी नागरिकांना या मेळाव्यातील विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे शासकीय सेवा व योजना आणि शासकीय योजनांच्या महा मेळाव्यात जिल्हाभरातील नागरिकांनी विविध शासकीय योजनांविषयी माहिती करून घेतली. दरम्यान, सकाळी 10 वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेर्पयत या महा मेळाव्यात विविध लाभार्थींना शासकीय योजनांची माहिती व माहितीपत्रंचे संबंधित विभागांच्या प्रतिनिधींनी वाटप केले. शासकीय योजनाच्या या मेळाव्यात नाशिक महानगरपालिका वैदयकीय विभागातर्फे विविध योजनांचा थेट लाभ देण्यासाठी जननी सुरक्षा योजना अंतर्गत लाभार्थी  लता पगारे यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचील एस एम बुक्के यांच्या हस्ते प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. या मेळाव्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे सावित्रीबाई फुले कल्याण योजने अंतर्गत प्रिया अढांगळे यांना लाभ देण्यात आला. तसेच जलसंपदा विभागामार्फत नागरिकांना महाराष्ट्र लोक सेवा हक्क अध्यादेश 2015 अंतर्गत विविध 10 सेवांची माहिती देण्यात आली .या महामेळाव्यात एकूण 3क् स्टॉल्स उभारले आहेत. त्यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नाशिक, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक, जिल्हा परिषद नाशिक, जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक, महावितरण, नाशिक महानगरपालिका, पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक शहर, पोलीस अधिक्षक कार्यालय नाशिक ग्रामीण, महिला व बाल विकास अधिकारी नाशिक, अदिवासी विकास आयुक्तालय नाशिक, महिला सुरक्षा विशेष शाखा, जिल्हा व पशु संवर्धन आयुक्तालय नाशिक, वनविभाग नाशिक, सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक, जिल्हा व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यालय नाशिक, जलसंपदा विभाग नाशिक, पोस्ट ऑफीस नाशिक, कामगार आयुक्त कार्यालय नाशिक, भुमी अभिलेख कार्यालय नाशिक, पाटबंधारे विभाग नाशिक, महिला आर्थिक  विकास महामंडळ नाशिक, या कार्यालयांनी भाग नोंदवत विविध योजनांची माहिती नागरिकांना दिली. 

Web Title: District Law Service Authority organized a government scheme in Nashik to bring the details of the schemes to the grassroot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.