कळवणला भाजपा उद्योग आघाडीची जिल्हास्तरीय बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:25 AM2017-09-03T00:25:57+5:302017-09-03T00:26:16+5:30
शेतकºयांच्या शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या माध्यमातून ठिकठिकाणी प्रक्रिया उद्योग उभारणार आहेत. या प्रक्रिया उद्योगात शेकºयांनाही सहभागी केले जाणार असल्याचे प्रतिपादन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले.
कळवण : शेतकºयांच्या शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या माध्यमातून ठिकठिकाणी प्रक्रिया उद्योग उभारणार आहेत. या प्रक्रिया उद्योगात शेकºयांनाही सहभागी केले जाणार असल्याचे प्रतिपादन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले.
भाजपा उद्योग आघाडीची जिल्हास्तरीय बैठक शनिवारी उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांच्या अध्यक्षतेखाली कळवण येथील हरिओम मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्य कार्यकारिणी सदस्य विकास देशमुख, उत्तर महाराष्ट्र मीडिया प्रमुख प्रवीण अलाई, राजेंद्र सोनवणे, शैलेंद्र आजगे, रमेश रावले, बाजीराव पवार, अनिल महाजन, रमेश पवार होते. उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी आपल्या मनोगतात नवनवीन उद्योग उभारणीसाठी शासनाकडून राबविल्या जाणाºया विविध योजना, तसेच उद्योगाबाबत शासनाची नवीन करप्रणाली, जीएसटीबद्दल असलेले गैरसमज याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोविंद कोठावदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, शहराध्यक्ष निंबा पगार, विश्वास पाटील, उद्योग आघाडी कळवणचे तालुकाध्यक्ष भूषण शिरोरे, राम चौरे, बेबीलाल पालवी, हेमंत रावले, संदीप अमृतकार, श्रीधर कोठावदे, दादा मोरे, अशोक चव्हाण, नामदेव गुंजाळ, राजू पाटील, तेजस कोठावदे, सुरेश निकम, वैभव कोठावदे, केदारनाथ कोठावदे, दिनकर फळकत्ते, सुभाष अहेर, धनराज कानडे, बाळासाहेब फुलदेवरे, उमेश पगार, कमलेश पिरारोस, प्रकाश पवार, शरद पगार, प्रफुल कुमार, भाऊसाहेब आहेर उपस्थित होते. राजेंद्र अमृतकार यांनी सूत्रसंचालन केले. भूषण शिरोरे यांनी आभार मानले.