जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:14 AM2020-12-22T04:14:09+5:302020-12-22T04:14:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : राज्यातील युवकांमध्ये एकात्मतेची भावना जागृत करणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून युवा वर्गातील सुप्त गुणांना ...

District level youth festival | जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : राज्यातील युवकांमध्ये एकात्मतेची भावना जागृत करणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून युवा वर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केंद्र शासनामार्फत आयोजित केला जाणारा युवा महोत्सव यंदा कोरोनामुळे २६ डिसेंबरला ऑनलाइन रंगणार आहे.

देशभरात दरवर्षी १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. देशातील संस्कृती व परंपरा जतन करून या संस्कृतीचे संवर्धन करणारा प्रातिनिधीक युवा संघ वरील राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होतो. महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन होऊन स्पर्धकांची विभाग स्तरावर आणि त्यातून गुणी कलावंतांची निवड होऊन राज्यस्तरावरील युवा महोत्सवासाठी विभागाचा संघ पाठविला जातो. त्यानुसार सन २०२०-२१ या वर्षाचे जिल्हास्तरीय महोत्सवाचे आयोजन कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने २६ डिसेंबरला करण्यात येणार आहे. त्यात लोकनृत्य, लोकगीत, शास्त्रीय नृत्याचे सर्व प्रकार, शास्त्रीय गायन, विविध वाद्यांचे शास्त्रीय वादन, वक्तृत्व स्पर्धा, तसेच हिंदी आणि इंग्रजी एकांकिकांचा त्यात समावेश आहे. गुगल मिट या ॲपवर जिल्हास्तरीय महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रवेश अर्ज २४ डिसेंबरपर्यंत महेश पाटील यांच्याशी संपर्क साधून सादर करण्यात यावा, तसेच dsonashik.dsys-mh@gov.in या मेलवर सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शालेय, युवक मंडळे यातील इच्छुक कलावंत, स्पर्धकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: District level youth festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.