जिल्हा परिषदेत ७०० पदांची ‘मेगा भरती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 01:55 AM2018-12-21T01:55:06+5:302018-12-21T01:55:35+5:30

महाराष्टÑ शासनाच्या वतीने लवकरच मेगा भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील रिक्त पदांचीही भरती होणार असून, सुमारे ७०० पदे भरली जाणार असल्याचे वृत्त आहे.

District Magistrate recruited 700 posts in 'Mega Bharti' | जिल्हा परिषदेत ७०० पदांची ‘मेगा भरती’

जिल्हा परिषदेत ७०० पदांची ‘मेगा भरती’

Next

नाशिक : महाराष्टÑ शासनाच्या वतीने लवकरच मेगा भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील रिक्त पदांचीही भरती होणार असून, सुमारे ७०० पदे भरली जाणार असल्याचे वृत्त आहे. विविध विभागांमध्ये रिक्त जागांमुळे यंत्रणेवर मोठा ताण येत असल्याने सर्वांना भरतीची प्रतीक्षा आहे. ही प्रतीक्षा लवकरच संपणार असून, भरतीची कारवाई करण्याच्या प्रारूप कामालादेखील सुरुवात झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये सुमारे १३०० पेक्षा जास्त रिक्त पदे आहेत. सेवानिवृत्त आणि अन्य कारवायांमुळे आणखी काही कर्मचारी कमी झाले आहेत. त्यामुळे मुख्यालय आणि तालुका पातळीवर कामकाजामध्ये अनेक अडचणी येत असल्याच्यादेखील तक्रारी केल्या जातात. विशेषत: शिक्षण आणि आरोग्य विभागात रिक्त पदांची संख्या जास्त असल्याने भरतीत या दोन विभागांची पदे भरण्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.




शासनाच्या या मेगा भरतीत जिल्हा परिषदेला ७०० पदे भरण्याची परवानगी मिळणार असल्याने त्याबाबतचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

Web Title: District Magistrate recruited 700 posts in 'Mega Bharti'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.