जिल्ह्यात आता 'सारी' रुग्णाचीही भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 10:12 PM2020-05-27T22:12:09+5:302020-05-27T22:12:30+5:30

कोरोना रुग्णासारखीच लक्षणे असणाऱ्या सारी आजारात प्रामुख्याने श्वास घेण्यास त्रास होणे, खूप ताप, सर्दी, खोकला लागणे, फुफुसात सूज येणे, अल्पावधीत रुग्ण गंभीर होणे असे लक्षणे आहेत,

The district is now full of 'sari' patients | जिल्ह्यात आता 'सारी' रुग्णाचीही भर

जिल्ह्यात आता 'सारी' रुग्णाचीही भर

googlenewsNext
ठळक मुद्देकोविड प्रमाणेच उपचार करण्यावर भर दिला जात आहे

नाशिक :  जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असताना त्यात आता 'सारी' रुग्णाचीही भर पडली असून, या आजाराने औरंगाबाद येथे घेतलेले बळी पाहता, सारी चे रुग्ण सापडताच त्याची कोविड टेस्ट करून तात्काळ उपचार केले जात आहेत.
कोरोना रुग्णासारखीच लक्षणे असणाऱ्या सारी आजारात प्रामुख्याने श्वास घेण्यास त्रास होणे, खूप ताप, सर्दी, खोकला लागणे, फुफुसात सूज येणे, अल्पावधीत रुग्ण गंभीर होणे असे लक्षणे आहेत, त्यामुळे सध्या कोरोना सारखीच लक्षणे दिसणाऱ्या परंतु कोरोना नसणाऱ्या रुग्णाला कोविड प्रमाणेच उपचार करण्यावर भर दिला जात आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते सारी हा आजार या पूर्वी देखील होता, फक्त त्याचे निदान होत न्हवते, आता कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केल्यावर प्रामुख्याने सारी आजाराचे गंभीर्य लक्षात येऊ लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रत्येक गावात आरोग्य विभागाने कोरोना केअर सेंटर सुरू करून नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात असल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सारी आजाराचे रुग्ण आढळू लागले आहेत, या आजाराच्या रुग्णांची स्वतंत्र नोंद ठेण्यात येत असून काल पर्यंत 17 रुग्ण सारी आजाराने बाधित असल्याचे सांगण्यात आले, त्यात चांदवड ला 3 व कळवणला 14 रुग्ण आढळून आले, त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मात्र सारी आजाराने जिल्ह्यात डोके वर काढू नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जात आहे. सारी आजाराचे विषाणू अनेक प्रकारचे असल्याने त्याला अगोदर प्रतिबंध करणे अवघड असले तरी या रुग्णांना वेळेवर जलदगतीने उपचार मिळणे हेच महत्त्वाचे मानले जाते.
साध्य अशा प्रकारचे रुग्ण सापडल्यास त्याचेही घश्याचे नमुने घेवून ते कोरोना प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत. कोरोना पोसिटिव्ह असल्यास कोरोना प्रतिबांध उपाय केले जात आहेत तर निगेटिव्ह असल्यास सारी वर उपचार केले जात आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते, डेंग्यू, स्वाइन फ्ल्यूच्या साथीच्या काळातही सारी आजार कायम होता, मात्र या साऱ्या आजारावर टॉमी फ्ल्यू चे औषधे गुणकारी ठरले होते, आताही कोरोना बाधित किंवा सारी आजाराने पीडित रुग्णाला2 टॉमी फ्ल्यू दिले जात आहे. औरंगाबाद येथे सारी ने अनेक बळी घेतले आहेत, नाशिक जिल्ह्यात मात्र सारी चे रुग्ण झपाट्याने बरे होत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

Web Title: The district is now full of 'sari' patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.