जि. प. कर्मचाऱ्यांचेही अपंग प्रमाणपत्र बोगस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:37 AM2018-08-31T00:37:06+5:302018-08-31T00:37:18+5:30

नाशिक : जिल्हा परिषदेतील काही कर्मचाºयांनी बदल्यांच्या लाभासाठी अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीत जिल्हा परिषदेतील दोन कर्मचारी दोषी आढळल्याने त्यांना नोटिसा बजाविण्यात आल्याचे वृत्त आहे.

District Par. Employees' Handicapped Certificate bogus | जि. प. कर्मचाऱ्यांचेही अपंग प्रमाणपत्र बोगस

जि. प. कर्मचाऱ्यांचेही अपंग प्रमाणपत्र बोगस

Next
ठळक मुद्देदोघांना नोटिसा : बनावट प्रमाणपत्र

नाशिक : जिल्हा परिषदेतील काही कर्मचाºयांनी बदल्यांच्या लाभासाठी अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीत जिल्हा परिषदेतील दोन कर्मचारी दोषी आढळल्याने त्यांना नोटिसा बजाविण्यात आल्याचे वृत्त आहे.
जिल्हा परिषदेकडील शिक्षकांकडून अपंगांचे बोगस प्रमाणपत्र सादर करून बदलीचे लाभ मिळविले जात असल्याच्या तक्रारी प्रहार संघटनेकडून करण्यात आल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी शिक्षण विभागातील बोगस प्रमाणपत्र सादर करणाºया शिक्षकांवर कारवाई केली होती.
या प्रकरणी केवळ शिक्षकांनीच नव्हे तर जिल्हा परिषदेतील काही कर्मचाºयांनीदेखील बदली टाळण्यासाठी अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर अशा कर्मचाºयांच्या प्रमाणपत्र तपासणीचा निर्णय घेण्यात आला होता.
प्रशासनाने केलेल्या तपासणीत जिल्हा परिषदेतील दोन कर्मचाºयांनी सादर केलेले प्रमाणपत्र हे बोगस आढळून आल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने या दोन्ही कर्मचाºयांना नोटिसा बजावल्याचे समजते. संबंधितांना शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी खातेनिहाय चौकशी आणि कारवाई करण्यासंदर्भात इशारा देण्यात आला असल्याचेही बोलले जात आहे. दोेघे आढळले दोषीअपंग प्रमाणपत्र दाखल केलेल्या शिक्षकांचे प्रमाणपत्र पडताळणी करण्याचे आदेश तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी काढल्यानंतर मुख्यालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचाºयांनी देखील अशाच प्रकारे प्रमाणपत्रे सादर केल्याच्या थेट तक्रारी झाल्यानंतर अशा कर्मचाºयांची चौकशी करण्यात आली. यामध्ये केवळ दोन कर्मचारी दोषी आढळून आले आहेत. या कर्मचाºयांवर आता काय कारवाई होते, याकडे कर्मचाºयांचे लक्ष लागले आहे.

Web Title: District Par. Employees' Handicapped Certificate bogus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.