जि. प. कर्मचाऱ्यांना वेतन आयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:10 AM2019-06-12T00:10:20+5:302019-06-12T00:11:30+5:30
शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. मात्र, जिल्हा परिषद पंचायत राज सेवार्थ प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याने याचा लाभ मिळण्यास विलंब होत होता. मात्र ग्रामविकास विभागाने अलीकडेच शासन परिपत्रक काढून जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व ४ मधील कर्मचाºयांना सुधारित वेतन संरचनेसाठी सेवार्थ प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हा परिषद कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.
नाशिक : शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. मात्र, जिल्हा परिषद पंचायत राज सेवार्थ प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याने याचा लाभ मिळण्यास विलंब होत होता. मात्र ग्रामविकास विभागाने अलीकडेच शासन परिपत्रक काढून जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व ४ मधील कर्मचाºयांना सुधारित वेतन संरचनेसाठी सेवार्थ प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हा परिषद कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.
राज्य शासनाकडून शासकीय कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. त्यानुसार शासनाच्या विविध विभागांतील कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन अदा करण्यात येत आहे.
मात्र पंचायत राज सेवार्थ प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याने जिल्हा परिषद कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा होती.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या सर्व वर्ग ३ व वर्ग ४ मधील कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला निर्देश दिले आहेत.
ग्रामविकास विभागाचे आवाहन
ग्रामविकास विभागाने याबाबत परिपत्रक काढून सुधारित वेतन संरचनेसाठी सेवार्थ प्रणाली लागू करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे. तसेच सदर प्रणाली सुधारित संरचनेसाठी राज्यभरात उपलब्ध करून देण्यात आली असून, जिल्हा परिषदांनी याचा लाभ घेण्याचे आवाहनही ग्रामविकास विभागाने केले आहे.