राष्ट्रसेविका समितीच्या वतीने जिल्हा पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:57 PM2017-11-19T23:57:58+5:302017-11-20T00:00:34+5:30

राष्ट्रसेविका समितीचे पथसंचलन नाशिक : राष्ट्र सामर्थ्यशाली व्हायचे असेल तर राष्ट्रातील प्रत्येक स्त्री सर्वार्थाने सक्षम होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेच्या अध्यक्ष शशी अहेर यांनी केले.

District Pathashankaran on behalf of National Service Committee | राष्ट्रसेविका समितीच्या वतीने जिल्हा पथसंचलन

राष्ट्रसेविका समितीच्या वतीने जिल्हा पथसंचलन

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रसेविका समितीच्या वतीने जिल्हा पथसंचलन संचलन मार्गात सडा-रांगोळ्या काढून ठिकठिकाणी पुष्पवृष्टीने स्वागत

नाशिक : राष्ट्र सामर्थ्यशाली व्हायचे असेल तर राष्ट्रातील प्रत्येक स्त्री सर्वार्थाने सक्षम होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेच्या अध्यक्ष शशी अहेर यांनी केले.
राष्ट्रसेविका समितीच्या वतीने आयोजित जिल्हा पथसंचलन समारोपप्रसंगी शशी अहेर बोलत होत्या. सद्यस्थितीत तर महिलांनी सामाजिक, मानसिक, आत्मिक आणि शारीरिकदृष्ट्या बलवान होणे अतिशय गरजेचे असून स्वत:वर होणाºया अन्याय, अत्याचाराच्या विरोधात आता आपल्याला खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रसेविका समितीच्या पश्चिम क्षेत्र कार्यवाहिका सुनंदा जोशी उपस्थित होत्या. प्रारंभी आमदार सीमा हिरे, नगरसेवक छाया देवांग यांच्या हस्ते ध्वजपूजन करून संचलनाला प्रारंभ करण्यात आला. आमदार सीमा हिरे, नगरसेविका छाया देवांग, डॉ. दीपाली कुलकर्णी, माजी आमदार निशिगंधा मोगल, भाग्यश्री ढोमसे, मंजूषा दराडे, महेश हिरे, अनिल चांदवडकर, दिलीप देवांग, राकेश ढोमसे, सचिन कुलकर्णी, बाजीराव पाटील, मंगेश खाडीलकर, किरण क्षत्रीय, अंकुश बरशिले आदी पथसंचलनात सहभागी झाले होते.दोनशे सेविकांचा सहभागनाशिक शहरासह पाच तालुक्यांतून आलेल्या राष्ट्रसेविका समितीच्या गणवेशधारी २०० सेविकांसह १०० सेविकांचे घोषपथकाने पवननगर, तोरणानगर, महाकाली चौक, राजरत्नगर, उत्तमनगरमार्गे शिस्तबद्ध पथसंचलन काढण्यात आले. संचलन मार्गात सडा-रांगोळ्या काढून ठिकठिकाणी पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले.

Web Title: District Pathashankaran on behalf of National Service Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.