जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट नऊ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 01:31 AM2022-02-09T01:31:55+5:302022-02-09T01:32:18+5:30
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र असल्याने पॉझिटिव्हिटी रेटदेखील कमी झाला आहे. जानेवारी महिन्यात ४४ टक्क्यांवर असलेला पॉझिटिव्हिटी रेट आता ९.३५ टक्के खाली आला आहे. कोरोना रुग्णसंख्येचा आलेख सतत घटत राहिल्यास जिल्ह्यात सध्या लागू असलेले निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता आहे.
नाशिक : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र असल्याने पॉझिटिव्हिटी रेटदेखील कमी झाला आहे. जानेवारी महिन्यात ४४ टक्क्यांवर असलेला पॉझिटिव्हिटी रेट आता ९.३५ टक्के खाली आला आहे. कोरोना रुग्णसंख्येचा आलेख सतत घटत राहिल्यास जिल्ह्यात सध्या लागू असलेले निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. सेामवारच्या तुलनेत मंगळवारी रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढली असल्याने नागरिकांना जाणीवपूर्वक निर्बंधाचे पालन करावे लागणार आहे. गेल्या सोमवारी ३८९ इतक्या बाधितांची नोंद झालेली असताना मंगळवारी मात्र ४६१ कोरोना रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्या सातत्याने घटत असल्याने जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असताना वाढणारी रुग्णसंख्या त्यास अडसर ठरणारी ठरू शकते.
गेल्या आठवडाभरात रुग्णांची संख्या कमी झाल्याने प्रशासनालादेखील काहीसा दिलासा मिळाला आहे. कोरोना राेखण्यासाठी मास्क हेच प्रभावी माध्यम असून, कोरोना निर्बंधांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे. मंगळवारी ४६१ कारोना रुग्ण आढळून आले, तर १०३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र तीन जणांचा मृत्यू झाल्याचीदेखील नोंद झाली आहे. पॉझिटिव्हिटी रेट हा ९.३५ टक्के इतका झाला आहे.