हिरे, बच्छाव विरोधातील दावा जिल्हा उपनिबंधकांनी फेटाळला
By admin | Published: September 17, 2016 12:05 AM2016-09-17T00:05:18+5:302016-09-17T00:05:27+5:30
हिरे, बच्छाव विरोधातील दावा जिल्हा उपनिबंधकांनी फेटाळला
मालेगाव : तालुक्यातील निमगाव मल्टिपरपज् को-आॅप. सोसायटीत संचालक नसल्याचा मुद्दा पुढे करुन बाजार समिती सभापती प्रसाद हिरे यांच्या तर दीपज्योती संस्थेत प्रतिनिधी असल्याचे कारणावरुन संचालक बंडू बच्छाव यांचे कृउबाचे संचालक पद अपात्रतेचा दावा जिल्हा उपनिबंधकांनी फेटाळून लावला आहे.
बाजार समितीच्या संचालकपदाला आव्हान देणारा दावा जिल्हा उपनिबंधकांनी फेटाळल्यानंतर प्रसाद हिरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी हिरे म्हणाले की, मालेगाव बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत दैवीकौल आमच्या बाजुने आल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्यांनी केवळ विरोध म्हणून अखंड बिनविरोध निवडणुकीच्या परंपरेला तिलांजली देत निमगाव मल्टिपरपज् को. आॅप. सोसायटीवर निवडणूक लादली. त्याच निवडणुकीचे भांडवल करीत आपले बाजार समितीचे संचालकपद घालविण्यासाठी दावा दाखल केला. त्यावर जिल्हा उपनिंबधक, सहकारी संस्था नाशिकचे कऱ्हे यांनी बाजार समितीच्या अधिनियमन कलम १३ (१) (अ) नुसार संचालक बाजार क्षेत्रात राहणाऱ्या शेतकऱ्यांमार्फत निवडून दिले जातात त्यासाठी बाजार क्षेत्रातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या संचालकपदी असणाऱ्या व्यक्तींची मतदार यादी तयार केली जाते. तथापि, सहकारी संस्थेस त्यांच्या संस्थेच्या वतीने स्वतंत्र प्रतिनिधी पाठविण्याचे कायद्यामध्ये कोणतीही तरतुद नसल्याचे विशिष्ट प्राथमिक सहकारी संस्थांचे प्रतिनिधित्व करीत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आपण निमगाव को. आॅप. मल्टीपरपज् सोसायटीचे संचालक नसलो तरी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी असल्याने कलम १५ (१) अन्वये अपात्र ठरत नसल्याचे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)