जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रावखंडे यांना पाठवले सक्तीच्या रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:15 AM2021-04-04T04:15:45+5:302021-04-04T04:15:45+5:30

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील दिरंगाई आणि गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आरोग्य मंत्र्यांशी फोनद्वारे संवाद ...

District Surgeon Dr. Sent to Ravkhande on compulsory leave | जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रावखंडे यांना पाठवले सक्तीच्या रजेवर

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रावखंडे यांना पाठवले सक्तीच्या रजेवर

Next

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील दिरंगाई आणि गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आरोग्य मंत्र्यांशी फोनद्वारे संवाद साधल्यानंतर शुक्रवारपासूनच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.

नाशिक शहर व जिल्हा कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना आढावा बैठक राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडली. व्हेंटिलेटर न मिळाल्याने एकीकडे रुग्ण दगावत असताना दुसरीकडे जिल्हा रुग्णालयातील अशा हलगर्जीमुळे पालकमंत्र्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. विभागीय मुख्यालय असलेल्या नाशिक जिल्हा रुग्णालयात केवळ १०० बेड्स कोरोनासाठी ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयामधील कोरोना रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली नाहीत. हलगर्जी आणि दिरंगाईबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, त्यामुळे भुजबळ यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्ती केली. जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना जिल्हा रुग्णालयाकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीनंतर तातडीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क करून ही गंभीर परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.

इन्फो

व्हेंटिलेटर पडून राहणे भोवले

या बैठकीत पालकमंत्री भुजबळ यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी नाशिक जिल्ह्यासाठी २२८ व्हेंटिलेटर प्राप्त झाले असून, त्यातील केवळ १९६ व्हेंटिलेटर बसवण्यात आले. त्यातील केवळ ग्रामीणमध्ये सात आणि जिल्हा रुग्णालयात सात असे एकूण १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. जिल्हा रुग्णालयात बसवण्यात आलेल्या ८० व्हेंटिलेटरपैकी फक्त ७ व्हेंटिलेटर रुग्णांच्या वापरात होते. उर्वरित ७३ व्हेंटिलेटर हे नॉन कोविड भागात विनावापर पडून आहेत, तसेच २३ व्हेंटिलेटर अद्याप कार्यान्वित न करता तसेच जिल्हाभरात पडून असल्याची बाब गंभीर असल्याबाबत कानउघाडणी करण्यात आली.

Web Title: District Surgeon Dr. Sent to Ravkhande on compulsory leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.