जिल्हा रुग्णालयाला हवा उद्योगांचा ‘आधार’ जिल्हा शल्यचिकित्सकांचा पुढाकार : सीएसआर निधीसाठी प्रयत्नशील
By admin | Published: December 9, 2014 01:10 AM2014-12-09T01:10:37+5:302014-12-09T01:11:17+5:30
जिल्हा रुग्णालयाला हवा उद्योगांचा ‘आधार’ जिल्हा शल्यचिकित्सकांचा पुढाकार : सीएसआर निधीसाठी प्रयत्नशील
नाशिक : औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना सामाजिक उत्तरदायित्वासाठी (सीएसआर) खर्च करावा लागणारा दोन टक्के निधी हा जिल्हा रुग्णालयातील विविध विकासकामांसाठी मिळावा यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांनी पुढाकार घेतला आहे़ यासाठी त्यांनी औद्योगिक सहसंचालकांची भेट घेतली असून, आमदार छगन भुजबळ व निर्मला गावित यांच्याशीदेखील चर्चा केली आहे़ औद्योगिक कंपन्यांना दरवर्षी सीएसआर निधीची तरतूद करून हा निधी सामाजिक कार्यावर खर्च करावा लागतो़ औद्योगिक कंपन्यांनी हा निधी जिल्हा रुग्णालयाला दिल्यास जिल्हा तसेच विभागातून येणाऱ्या विविध रुग्णांना चांगल्या पद्धतीने रुग्णसेवा देण्यासाठी करता येईल़ यासाठी डॉ़ माले यांनी औद्योगिक सहसंचालक पी़ बी़ धाबेराव व अशोक डोंगरे यांची भेटही घेतली असून, लवकरच विविध कंपन्यांच्या संचालकांशीही संवाद साधणार आहेत़ औद्योगिक कंपन्यांनी जिल्हा रुग्णालयाला निधी दिल्यास या ठिकाणची यंत्रसामुग्री, विस्तारीकरण करणे शक्य होईल़ तसेच आरोग्यसेवेचा दर्जाही सुधारेल़ औद्योगिक कंपन्यांनी जिल्हा रुग्णालयातील विविध वॉर्ड, आयसीयू, लेबर रुम दत्तक घेऊन सुधारणांसाठी निधी उपलब्ध करून दिल्यास रुग्णांची चांगली सोय होणार आहे़ राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सचिव इंडझेड कुंदन यांनी नुकतीच जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयातील कामांबाबत समाधान व्यक्त केल्याची माहितीही डॉ़ माले यांनी दिली़