जिल्ह्यात विघ्नहर्ता बक्षीस योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 10:42 PM2017-08-12T22:42:44+5:302017-08-13T01:19:10+5:30
पंधरा दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून, तो उत्साहपूर्वक व भक्तिभावाबरोबरच गणेश मंडळांमध्ये सामाजिक भावना निर्माण करण्यासह जातीय सलोखा टिकवणारा ठरावा, यासाठी नाशिकचे ग्रामीण जिल्हाप्रमुख संजय दराडे यांनी गणेशोत्सव मंडळांसाठी ‘विघ्नहर्ता बक्षीस योजना’ जाहीर केली आहे.
सिन्नर : पंधरा दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून, तो उत्साहपूर्वक व भक्तिभावाबरोबरच गणेश मंडळांमध्ये सामाजिक भावना निर्माण करण्यासह जातीय सलोखा टिकवणारा ठरावा, यासाठी नाशिकचे ग्रामीण जिल्हाप्रमुख संजय दराडे यांनी गणेशोत्सव मंडळांसाठी ‘विघ्नहर्ता बक्षीस योजना’ जाहीर केली आहे.
जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांसाठी विघ्नहर्ता बक्षीस योजना राबविली जाणार असून, तरुणांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सामाजिक एकोपा वृद्धिंगत होईल असे संदेश समाजात प्रसारित करावे या हेतूने पोलीस अधीक्षक दराडे यांच्या संकल्पनेतून आगामी गणेशोत्सवात आदर्श गणेश मंडळांची निवड करून त्यांना पुरस्काराने गौरविले जाणार आहे. या योजनेत्ांर्गत जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत व उपविभागीय स्तरावर ‘विघ्नहर्ता मंडळ परीक्षण समिती’ स्थापन करण्यात येणार आहे. सदर समितीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी व प्रभारी पोलीस अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व सेवाभावी संस्थांचे पदाधिकाºयांची निवड करण्यात येणार आहे.
या समितीमध्ये महिला सदस्यांचाही समावेश असेल. परीक्षण समिती हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन सजावट, उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम, राष्टÑीय एकात्मतेवरील देखावे, बेटी बचाव, ग्रामस्वच्छता यावर अधारित देखावे किंवा उपक्रम राबविणाºया गणेश मंडळांना गुण देणार आहेत. जिल्हास्तरीय परीक्षण समितीचे अध्यक्ष अपर पोलीस अधीक्षक यांनी निवड केलेल्या पाच आदर्श गणेश मंडळांना प्रथम, द्वितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, शांतता समिती, पोलीसमित्र, प्रतिष्ठित नागरिक यांच्या बैठका घेण्याचे काम सुरू
आहे. गणेशोत्सवादरम्यान मंडळांच्या मंडपातील साउंड सिस्टीम अथवा डीजेमुळे होणाºया ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथक स्थापन करण्यात आले असून, नाईज मीटरचे साहाय्याने ध्वनीमर्यादेपेक्षा जास्त आवाज ठेवणाºया मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे.