सलून व्यावसायिकांचे आज जिल्हाभर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 10:21 PM2020-06-09T22:21:12+5:302020-06-10T00:08:22+5:30

मालेगाव/येवला : जिल्ह्यातील सर्व सलून व्यावसायिक बुधवारी (दि.१०) सकाळी ११ वाजता आपापल्या बंद दुकानाबाहेर काळी फीत लावून आंदोलन करत शासनाचा निषेध करणार असल्याची माहिती जिल्हा नाभिक समाजाचे अध्यक्ष संजय वाघ, तालुका अध्यक्ष डॉ. प्रकाश वाघ, युवा अध्यक्ष धीरज सस्कर यांनी दिली आहे.

District-wide agitation of salon professionals today | सलून व्यावसायिकांचे आज जिल्हाभर आंदोलन

सलून व्यावसायिकांचे आज जिल्हाभर आंदोलन

Next

मालेगाव/येवला : जिल्ह्यातील सर्व सलून व्यावसायिक बुधवारी (दि.१०) सकाळी ११ वाजता आपापल्या बंद दुकानाबाहेर काळी फीत लावून आंदोलन करत शासनाचा निषेध करणार असल्याची माहिती जिल्हा नाभिक समाजाचे अध्यक्ष संजय वाघ, तालुका अध्यक्ष डॉ. प्रकाश वाघ, युवा अध्यक्ष धीरज सस्कर यांनी दिली आहे.
येत्या १५ जूनपर्यंत शासनाने सलून दुकाने उघण्यास परवानगी दिली नाही, तर व्यावसायिक स्वत:च दुकाने उघडतील व वेळप्रसंगी कुटुंबीयांसह जेलभरो आंदोलन करतील, असा इशारा महाराष्ट्र नाभिक महामंडळाने शासनास दिला आहे. येवल्यात तहसीलदार रोहिदास वारूळे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
निवेदनावर समाजाचे नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष गणेश जाधव, सचिन सोनवणे, सुनील सस्कर, ज्ञानेश्वर संत, निलेश भागवत, राजेंद्र मंडलिक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: District-wide agitation of salon professionals today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक