दाभाडीत सरपंचावर अविश्वास, मतदान सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 03:02 PM2020-11-25T15:02:14+5:302020-11-25T15:02:28+5:30
मालेगाव (नाशिक ) :- तालुक्यातील राजकिय दृष्ट्या महत्वाच्या दाभाडी येथील सरपंच अविश्वास प्रस्ताव ठरावासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात आली.
मालेगाव (नाशिक ) :- तालुक्यातील राजकिय दृष्ट्या महत्वाच्या दाभाडी येथील सरपंच अविश्वास प्रस्ताव ठरावासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. गावात गेल्या एक ते दोन वर्षांपासून राजकीय वाद चालू होते. यात सरपंच चारुशीला निकम यांच्या विरुद्ध उपसरपंच सुभाष नहिरे यांनी विशेष मासिक सभेत अविश्वास प्रस्ताव मंजूर केला होता. सरपंच निकम या थेट जनतेतून निवडून आल्या असल्याने ग्रामसभेत अविश्वास प्रक्रिया मांडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. या सभेसाठी गेल्या आठ दिवसापासून राजकीय रंगत मिळाली होती. प्रत्यक्ष पत्रक वाटून व सोशल मीडिया द्वारे आरोप प्रत्यारोप करण्यात आले. शेवटी आजच्या ग्रामसभेच्या मतदानासाठी नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत ५२३८ नावे नोंदणी करण्यात आली. मतदार यादीत बऱ्याच मतदारांना नावे न मिळाल्याने परत जावे लागले. मतदान नोंदणी मोठ्या प्रमाणात झाल्याने निवडणूक लढत अटीतटीची झाली आहे. मतदान संपल्यानंतर लगेच त्याची मोजणी केली जाणार आहे, या प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.