साळसाणे, विटावेत दोन गटांत दंगल; दहा जणांना अटक
By admin | Published: October 18, 2014 12:25 AM2014-10-18T00:25:29+5:302014-10-18T00:25:39+5:30
साळसाणे, विटावेत दोन गटांत दंगल; दहा जणांना अटक
चांदवड : साळसाणे व विटावे येथे दोन गटांत निवडणुकीच्या कारणावरून दंगल झाल्याने चार जण जखमी झाले तर एक जणाची प्रकृती गंभीर आहे. दोन्ही गटाविरुद्ध चांदवड पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल झाला असून, दोन्ही गटांच्या दहा जणांना अटक करण्यात आली आहे.
पहिली फिर्याद नामदेव यादव कोल्हे (रा.साळसाणे शिवार) यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यात रवींद्र ठाकरे, जिभाऊ ठाकरे, अण्णा पवार, सोपान पवार, व्यंकट पवार, बाबाजी जाधव आदिंनी साळसाणे शिवारातील कोल्हे यांच्या घरासमोर सर्व आरोपींनी फिर्यादी नामदेव कोल्हे यांचा चुलत भाऊ राधाजी कोल्हे हा कुरापत काढून लाठ्या - काठ्या, लोखंडीगज व तलवार घेऊन आंनदा कोल्हे, राधाजी कोल्हे, त्यांची पत्नी जिजाबाई , मुलगा मोठाभाऊ कोल्हे व सून शोभाबाई कोल्हे यांना शिवीगाळ करून मारहाण केली त्यात राधाजी कोल्हे यांना गंभीर दुखापत झाली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरी फिर्याद रवींद्र ठाकरे सरपंच विटावे यांनी चांदवड पोलीस ठाण्यात दिली. यात आरोपी राधाजी कोल्हे, मोठाभाऊ कोल्हे, नामदेव कोल्हे, व्यंकट पवार, लक्ष्मण पवार, सयाजी पवार, भाऊसाहेब पवार, विजय पवार, नीलेश पवार आदिंनी विटावे शिवारात विजय पांडूरंग कोल्हे यांच्या घरासमोर निवडणुकीच्या कारणावरून कुरापत काढून फिर्यादी व साक्षीदार यांनी लाठ्या - काठ्या व तलवारीने मारहाण करून त्यांचे डोके फोडून दुखापत केली. याबाबत पोलीस ठाण्यात परस्परांविरोधी गुन्हे दाखल झाले आसून पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर व पोलीस तपास करीत आहेत.दरम्यान शासकीय १०१ ची रुग्णवाहीकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भालचंद्र पवार, गणेश खालकर हे घटनास्थळी गेले व त्यांनी जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाकल केले. (वार्ताहर)