शिक्षक भरतीस शिक्षण खात्याचाच खोडा

By admin | Published: February 19, 2016 11:24 PM2016-02-19T23:24:31+5:302016-02-19T23:25:11+5:30

अटी शर्ती : दोन वर्षांपासून संचमान्यताच नसल्याने खोळंबा

Ditch the education department to recruit teacher | शिक्षक भरतीस शिक्षण खात्याचाच खोडा

शिक्षक भरतीस शिक्षण खात्याचाच खोडा

Next

नाशिक : गेल्या चार वर्षांपासून शिक्षण खात्याने बंद केलेल्या शिक्षक भरतीला अखेर केंद्रीय भरती पद्धत बाजूला ठेवून परवानगी दिली खरी परंतु त्यासाठी ताज्या कर्मचारी संख्येच्या संचमान्यतेची अट घालण्यात आली आहे. शिक्षण खात्यानेच गेल्या दोन वर्षांपासून संच मान्यता न घेतल्याने आता शिक्षक भरती कशी करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या या घोळामुळे भरतीवरील बंदी उठवणे केवळ फार्स ठरला आहे.
राज्यात २०१२ पासून शिक्षक भरतीला बंदी घातली आहे. मध्यंतरी तर राज्यशासनाने शिक्षक भरती संस्थाचालकांना थेट करू न देता केंद्रीय पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली. त्यामुळे हा विषय अधिकच लांबला गेला. दरम्यानच्या काळात अनेक शाळांमध्ये शिक्षक निवृत्त झाल्याने दोन चार शिक्षकांवर विद्यार्थी सांभाळण्याची वेळ आली होती.

Web Title: Ditch the education department to recruit teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.