अजमीर सौंदाणे गावातील वळण बंधारा ओव्हरफ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 04:23 PM2020-09-06T16:23:07+5:302020-09-06T16:23:49+5:30
औंदाणे : अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील ग्रामपंचायतीतर्फे जुन महीन्यात कºहे रस्त्यावरील कनोरी नाल्यावरील २० ते २५ वर्षापूर्वी बुजल्या गेलेल्या ब्रिटीशकालीन जुना वळण बंधाऱ्याचा गाळ काढून खोलीकरणाचे काम केले होते. यावर्षी समाधानकारक पाऊसामुळे हा कनोरी बंधारा पूर्ण भरून ओव्हरफ्लो झाला असुन ग्रामस्थांकडुन समाधान व्यक्त केले जात आहे.

या बंधाºयात साठवणुक झालेल्या पाण्यामुळे त्या संपूर्ण शिवारातील शेतकऱ्यांना फायदा होईल असे सरपंच धनंजय पवार यांनी सांगितले.
इतर शिवारांनाही अशी कामे पुढच्या पावसाळ्यापर्यंत करून गावाची भूजल पातळी वाढवण्यासाठी आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे असेही सरपंच पवार यांनी सांगितले.
फोटो- (०६ औंदाणे)