नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी वातावरण निर्माण प्रचार साहित्यातही आली विविधता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 11:52 PM2017-12-02T23:52:29+5:302017-12-03T00:41:51+5:30
नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी वातावरण निर्माण झाले आहे.
इगतपुरी : नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी वातावरण निर्माण झाले आहे. शहरात वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे झेंडे व चिन्हे असलेल्या टोप्या तसेच कमळ, धनुष्यबाण, पंजा आदी चिन्हांची उपकरणे शहरात दाखल झाली आहेत. प्लॅस्टिकचे बिल्ले, तोरण, कटआउट इत्यादी प्रचाराच्या साहित्यांनी वातावरणनिर्मिती सुरू केली आहे.
पक्षांच्या चिन्हांचे एलइडी ब्रेसलेट हे या निवडणुकीच्या प्रचाराचे वैशिष्ट्य असणार आहे. प्लॅस्टिकबरोबर कागदी आणि पर्यावरणपूरक प्रचार साहित्यही विक्रेत्यांकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. इलेक्शन.... नो टेन्शन अशी जाहिरात करून इच्छुकांना आकर्षित करण्यात येत आहे. शहरात नगरपालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. प्रचारासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. कोपरा सभा, आंदोलने व विविध कार्यक्रमांसाठी सर्वच राजकीय पक्षांना प्रचार साहित्याची गरज भासते. त्यासाठी भाजपा, शिवसेना, काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, रिपाइं, भारिप-बहुजन इत्यादी पक्षांचे नाव, नेत्यांची छबी असलेले प्रचार साहित्य इगतपुरीमध्ये दाखल झाले आहे. प्रचारासाठी आवश्यक झेंडे हे साधारण टेरिकॉट, कॉटन अथवा सॅटिनच्या कापडापासून तयार केले जातात. यात दहा बाय पंधरा इंचांपासून ते चाळीस बाय साठ इंचापर्यंतच्या झेंड्यांचा समावेश आहे. यावेळी अधिक उमेदवार आहेत. त्यामुळे प्रचार साहित्यसुद्धा जास्त लागणार आहे. त्यादृष्टीने आम्ही कामाला सुरुवात केली आहे. सध्या झेंड्यांना अधिक मागणी असल्याचे प्रचाराचे साहित्य विकणाºया एका विक्र ेत्याने सांगितले.