दिव्यांग विद्यार्थ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:35 AM2018-04-24T00:35:26+5:302018-04-24T00:35:26+5:30
ज्ञानोपासना बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कृषीनगर येथील अंध मुलांचे वसतिगृह येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिक : ज्ञानोपासना बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कृषीनगर येथील अंध मुलांचे वसतिगृह येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात ब्रेल वाचन, वक्तृत्व स्पर्धा, गीत गायन, ब्रेल निबंध स्पर्धा आदी स्पर्धा घेण्यात आल्या. यात वक्तृत्व स्पर्धेत सिमरन पिंजारी या विद्यार्थिनीने महिला सुरक्षितता विषय निवडून अतिशय सुंदर असे वक्तृत्व सादर केले. मनीषा थोरात, तेजस्विनी ठाकरे, आशा महाजन यांनी अप्रतिम गीत गायन केले. ब्रेल वाचनमध्ये ललिता लकडे, क्र ांती हिंगणे, पूजा पठारे यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी निता पवार, सुवर्णा पगार, सोनाली रायजादे, संगीता कोते, योगिता क्षीरसागर, नेहा सरदार, उमेश वालझाडे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश पिंगळे, अक्षय व्यवहारे, तुषार शेलार, अमोल देशमुख, स्वप्नील जावळे, चंद्रकांत शिरसाट, अमित मोरे, विजय दशमुखे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.