घनकचरा विलगीकरणाचे प्रभागनिहाय नियोजन
By Admin | Published: May 12, 2017 06:00 PM2017-05-12T18:00:20+5:302017-05-12T18:00:20+5:30
नाशिक : महापालिकेने ओला व सुका कचरा विलगीकरणाची मोहीम सुरू केली.
नाशिक : महापालिकेने ओला व सुका कचरा विलगीकरणाची मोहीम सुरू केली असून, लोकजागृतीवर भर दिला जात आहे. विलगीकरणासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रभागनिहाय नियोजन केले आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार, महापालिकेने १ मे पासून ओला व सुका कचरा वेगवेगळा स्वीकारणे सुरू केले आहे. त्यासाठी अगोदर जनतेचे प्रबोधन केले जात आहे. ओला व सुका कचरा विलगीकरणाबाबत महापालिकेने प्रभागनिहाय नियोजन केले आहे. त्यानुसार, मे महिन्यात प्रभाग क्रमांक ९, १५, ७, २४, १, २, १७ आणि १८ असे आठ प्रभाग, जून महिन्यात प्रभाग क्रमांक ८, १०, १६, २३, १२, २५, २७, ३, ६, १८, १९, २० असे अकरा प्रभाग, तर जुलै महिन्यात प्रभाग क्रमांक ११,२६, ३०, १४, १३, २८, २९, ३१, ४, ५, २१ आणि २२ असे १२ प्रभाग निश्चित करण्यात आले आहे. आॅगस्टपासून शंभर टक्के ओला व सुका कचरा वेगवेगळ्या स्वरूपात स्वीकारला जाणार आहे.