पंचवटीचे विभागीय अधिकारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:19 AM2018-03-29T01:19:48+5:302018-03-29T01:19:48+5:30
महापालिकेतील कामचुकार, कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांच्याविरुद्ध कारवाईचे सत्र सुरूच असून, बुधवारी (दि. २८) पंचवटी विभागाचे प्रभारी विभागीय अधिकारी भीमाशंकर यल्लप्पा शिंगाडे यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करत निलंबित करण्यात आले. प्रभारी आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांच्याकडील पदभार काढून घेत त्यांच्या जागेवर डॉ. सचिन हिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक : महापालिकेतील कामचुकार, कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांच्याविरुद्ध कारवाईचे सत्र सुरूच असून, बुधवारी (दि. २८) पंचवटी विभागाचे प्रभारी विभागीय अधिकारी भीमाशंकर यल्लप्पा शिंगाडे यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करत निलंबित करण्यात आले. प्रभारी आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांच्याकडील पदभार काढून घेत त्यांच्या जागेवर डॉ. सचिन हिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरसचिव आर. आर. गोसावी यांच्याकडे पुन्हा एकदा पंचवटी विभागीय अधिकारीपदाची सूत्रे सोपविण्यात आली असून, नगरसचिवपदी गोरखनाथ आव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय गेल्या १२ वर्षांपासून कामावर गैरहजर असलेल्या एका शिपायासही सेवेतून कमी करत घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी प्रशासनात अनेक फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. कर्तव्यात कसूर करणाºया, कामचुकार अधिकारी व कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई केली जात आहे, तर असमाधानकारक कामामुळे काही अधिकाºयांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. बुधवारी (दि. २८) महापालिका प्रशासनाने असमाधानकारक कामकाजाबद्दल पंचवटी विभागाचे प्रभारी विभागीय अधिकारी भीमाशंकर यल्लप्पा शिंगाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. गेल्या महिनाभरात प्रशासनाकडून नेमून देण्यात आलेल्या विविध कामांबाबत समाधानकारक प्रगती न केल्याने शिंगाडे यांना तशी नोटीसही बजावण्यात आली होती. अखेर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. शिंगाडे यांच्या जागेवर नगरसचिवपदी महिनाभरापूर्वीच नेमण्यात आलेले आर. आर. गोसावी यांची पुन्हा एकदा पंचवटीचे विभागीय अधिकारीपदी रवानगी करण्यात आली आहे. गोसावी यांच्याकडील नगरसचिवपदाचा कार्यभार सहायक नगरसचिव गोरखनाथ आव्हाळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याशिवाय सन १७ नोव्हेंबर २००५ पासून कामावर सतत गैरहजर राहिलेल्या पश्चिम विभागीय कार्यालयातील शिपाई सुनील शांताराम मिंधे यास सेवेतून कमी करण्यात आले आहे. मिंधे याची विभागीय चौकशी लावण्यात आलेली होती. त्यात तो दोषी आढळल्याने त्याला सेवेतून कमी करण्याची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.
शिक्षकांसाठी प्रशिक्षण