दिव्यांगांनी ३४ योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 12:51 AM2017-09-05T00:51:40+5:302017-09-05T00:51:47+5:30

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांगांसाठी स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी विविध प्रकारच्या ३४ योजना कार्यरत आहेत. या ३४ योजनांचा दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य रुपांजली विनायक माळेकर यांनी केले आहे.

 Divyang appealed to take advantage of 34 schemes | दिव्यांगांनी ३४ योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

दिव्यांगांनी ३४ योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Next

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांगांसाठी स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी विविध प्रकारच्या ३४ योजना कार्यरत आहेत. या ३४ योजनांचा दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य रुपांजली विनायक माळेकर यांनी केले आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रुपांजली माळेकर यांनी म्हटले आहे की, शासन दरबारी विविध योेजना राबविल्या जातात. परंतु या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली जात नाही किंवा पोहोचण्यास कुचकामी होऊन शासन दरबारी तशाच पडून असतात. दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजनांचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरून पाठविले जातात. या योजनांमध्ये अस्थि दिव्यांगांसाठी कॅलिपर्स, तीन चाकी सायकल, स्वयंचलित तीनचाकी सायकली, कृत्रिम अवयव, कुबड्या, वॉकर, सर्जिकल फुटवेअर, मोबिलीटी, कमोड चेअर (खुर्ची), कमोड स्तल, स्पेन अड, नील वाकी ब्रेस, डिवायसेत फॉर ई- लिव्हिंग आदी साहित्यांचा समावेश आहे. अंध व्यक्तींसाठी मोबाइल, लॅपटोप, नोटवेअर, संगणक, बे्रल लेखन साहित्य, टाइपरायटर, लार्ज प्रिंट बुक, अल्प दृष्टी यावर मात करण्यासाठी डिजीटल मॉग्नीफायर कामाचे आहे. बहुविकलांग व्यक्तींसाठी सीपी वेअर, स्वयंचलित सायकल व खुर्ची, संगणक वापराचे सहाय्यभूत उपकरणे यांसह विविध योजना कार्यरत आहेत. या ३४ योजनांचा दिव्यांगांनी लाभ करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य रुपांजली विनायक माळेकर यांनी केले आहे.

Web Title:  Divyang appealed to take advantage of 34 schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.