मायबोली विद्यालयात दिव्यांग दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 08:28 PM2020-12-03T20:28:51+5:302020-12-04T01:07:16+5:30
येवला : समता प्रतिष्ठान येवला संचलित मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयात आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.
येवला : समता प्रतिष्ठान येवला संचलित मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयात आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे शाळांना सुट्ट्या असल्यामुळे प्रथमच विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात ऑनलाइन सहभाग नोंदविला. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व संस्थेच्या वतीने समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे यांच्या हस्ते तालुक्यातील दिव्यांगांना यूडीआयडी (स्वावलंबन) कार्डांचे वाटप करण्यात आले. प्रारंभी हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी कोकाटे, दिव्यांग बांधव संजय खोकले यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक बाबासाहेब कोकाटे यांनी शासनाच्या स्वावलंबन कार्डाचे फायदे सांगितले, तर सुखदेव आहेर यांनी आभार मानले. याप्रसंगी तालुक्यातील दिव्यांग लाभार्थी, शिक्षक हेमंत पाटील, मंदा पडोळ, संतोष कोकाटे, रेखा दुनबळे, नितीन कदम, रावसाहेब खराटे, विजय जाधव, रावसाहेब सोनवणे, मारुती पगारे, देवीदास पगारे, शोभा कदम आदी उपस्थित होते.